Bappi Lahiri : एका वर्षात 180 गाणी, बप्पी लाहिरींनी केला होता वर्ल्ड रेकॉर्ड ; 'ही' वस्तू कायम होती सोबत
काही वर्षापूर्वी बप्पी लाहिरी यांनी 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) मध्ये हजेरी लावली होती. या वेळी त्यांनी काही खास गोष्टी सांगितल्या होत्या.
Bappi Lahiri : प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचे काल (15 फेब्रुवारी) निधन झाले. हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या हटक्या संगीताने बप्पी लाहिरी यांनी विशेष ओळख निर्माण केली. त्यांच्या तम्मा तम्मा लोगे, डिस्को डान्सर, याद आ रहा है तेरा प्यार या बप्पी लाहिरी यांच्या सुपर हिट गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. काही वर्षापूर्वी बप्पी लाहिरी यांनी 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) मध्ये हजेरी लावली होती. या वेळी त्यांनी काही खास गोष्टी सांगितल्या होत्या.
बप्पी लाहिरी यांनी द कपिल शर्मा शोमध्ये त्यांच्याकडे असणाऱ्या एका खास वस्तूबाबत सांगितलं. बप्पी लाहिरी एक कडं नेहमी हातामध्ये घालत होते. ते कडं त्यांच्या आईनं अमृतसर येथील सुवर्ण मंदिरामधून आणलं होतं. ते त्यांच्यासाठी लकी आहे, असं त्यांनी सांगितलं.
बप्पी लाहिरी यांनी वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी त्यांनी तबला शिकण्यास सुरुवात केली बप्पी लाहिरी यांनी 19 व्या वर्षी कोलकातामधून मुंबईमध्ये येण्याचा निर्णय घेतला. 1986 मध्ये बप्पीदांनी 33 चित्रपटांतील 180 गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांच्या या कामगिरीची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड' रेकॉर्डमध्ये झाली आहे. संगीत दिग्दर्शक बप्पी लाहिरी यांनी सुमारे साडेसहाशे चित्रपटांना संगीत दिले आहे. हिंदी, बंगाली व्यतिरिक्त त्यांनी जवळपास सर्व भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तसेच, 5000 हून अधिक गाणी रचली आहेत.
हेही वाचा :
- PM Modi on Bappi Lahiri : 'जिंदादिल बप्पी लाहिरींच्या निधनानं दु:खी झालोय'; आठवण शेअर करत पंतप्रधान मोदींच्या भावना
- PHOTO : 'सोन्या'सारखा माणूस गेला! अलोकेश लाहिरी ते लाडके 'बप्पीदा'; जीवनप्रवास कसा होता?
- Bappi Lahiri : बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही दिसली बप्पीदांची जादू, ‘गोल्डन सिंगर’बद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha