Bada Naam Karenge : रिषभ अन् सुरभीची Old School लव्ह स्टोरी, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरीज
Bada Naam Karenge : 'बडा नाम करेंगे' या सीरिजमध्ये रिषभ आणि सुरभी म्हणून रितिक घनशानी आणि आयेशा कडुस्कर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Bada Naam Karenge Series : सूरज बडजात्या यांची ओल्ड स्कूल कहाणी असलेली सीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बडा नाम करेंगे' सीरिजमध्ये रितिक घनशानी आणि आयेशा कडुस्कर मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 'बडा नाम करेंगे' सीरिजची हृदयस्पर्शी कथा रिषभ आणि सुरभी यांच्याभोवती फिरते. यामध्ये तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणणारे आणि डोळ्यात टचकन पाणी आणणारे अनेक क्षण पाहायला मिळतील. याचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी समोर आला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. रिषभ व सुरभी तुम्हाला हास्य, भावूक आणि संस्मरणीय क्षणांच्या प्रवासावर घेऊन जाण्यास सज्ज आहेत.
'बडा नाम करेंगे' सीरिज
या सीरिजमध्ये प्रेम, कुटुंब आणि परंपरामधून नात्यामधील खास भावना दिसून येतात. मोहक रितिक घनशानी आणि उत्साही आयेशा कडुस्कर यांनी साकारलेल्या भूमिका रिषभ आणि सुरभी तुम्हाला हास्य, भावूक आणि संस्मरणीय क्षणांच्या प्रवासावर घेऊन जाण्यास सज्ज आहेत. त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण दिवस जवळ येतो, तसा त्यांचा गतकाळ त्यांच्यासमोर उभा राहतो आणि त्यांनी त्यांच्या मनाचे ऐकावे की त्यांच्या कुटुंबांच्या इच्छांचा मान राखावा हे ठरवावे लागते. उत्साहपूर्ण घटना आणि रहस्यमय शोधांदरम्यान रिषभ आणि सुरभीला समजते की, प्रेम म्हणजे फक्त परंपरा नाही, तर संकटामध्ये एकमेकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणे महत्त्वाचे आहे.
'हे' कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत
राजश्री प्रोडक्शन्स निर्मित या सीरीजमध्ये रितिक घनशानी, आयेशा कडुस्कर, साधिका सयाल, कंवलजीत सिंह, अल्का आमिन, राजेश जैस, चित्राली लोकेश, राजेश तेलंग, अंजना सुखानी, जमील खान, दीपिका आमिन, ग्यानेंद्र त्रिपाठी, प्रियमवदा कांत आणि ओम दुबे, हे कलाकार आहेत.
रिषभ अन् सुरभीची रोमँटिक लव्ह स्टोरी
रितिक घनशानी रिषभची भूमिका साकारणार असून या भूमिकेबद्दल सांगताना तो म्हणाला की, ''रिषभला आपल्या जीवनप्रवासामध्ये वैयक्तिक इच्छा आणि कुटुंबाच्या अपेक्षांमध्ये संतुलन राखण्याचा संघर्ष करावा लागतो. रतलाममध्ये मोठा झालेला तो दयाळू, प्रेमळ व्यक्ती आहे, पण त्याच्या कुटुंबाच्या त्याच्यासाठी असलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्याच्या आव्हानाचा सामना करावा लागतो. रिषभला त्याच्या कुटुंबाप्रती असलेल्या प्रेमामुळे कधी-कधी दुहेरी जीवन जगावे लागते, इतरांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी ओळख सिक्रेट ठेवावी लागते. पण या सर्व घडामोडींमध्ये खरे प्रेम शोधण्यासोबत स्वत:शी प्रामाणिक राहण्याचा त्याचा प्रयत्न सर्वांचे लक्ष वेधून घेतो.''
आयेशा कडुस्कर काय म्हणाली?
आयेशा कडुस्करने सुरभीच्या भूमिकेबाबत सांगताना म्हटलं की, ''सुरभी आधुनिक विश्वातील प्रेम आणि कौटुंबिक मूल्यांची खरी प्रतीक आहे. उज्जैनमध्ये मोठी झालेल्या तिच्यामधून लहान शहरातील मुलीची ताकद दिसून येते, आव्हानात्मक काळात स्वत:शी प्रामाणिक राहण्याची तिची क्षमता तिला इतरांपेक्षा वरचढ ठरवते. रिषभसोबतचे तिचे नाते परस्पर आदर, विश्वास आणि पाठबळाचे आहे, जेथे ते एकत्र जीवनातील चढ-उतारांचा सामना करतात. सुरभीच्या माध्यमातून ही सिरीज प्रेम आणि कुटुंबामधील नातेसंबंधांना दाखवते, तसेच आपल्याला शिकवण देते की, आपल्या स्वत:शी प्रामाणिक राहणे अर्थपूर्ण नाते घडवण्यासाठी महत्त्वाचे आहे. मी ही प्रबळ, कुटुंब-केंद्रित भूमिका प्रत्यक्षात सादर करण्यास उत्सुक आहे आणि मला खात्री आहे की, प्रेक्षक सुरभीच्या प्रेम आणि विकासाप्रती प्रवासाशी जुळून जातील.''
महत्त्वाच्या इतर बातम्या :