Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत आयुष्यमान खुरानाला मिळाली मोठी जबाबदारी, व्हिडीओ आला समोर
Ayushmann Khurrana Lok Sabha Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने आयुष्यमान खुरानाला युथ आयकॉन म्हणून नियुक्त केले आहे. आता आयुष्यमान खुराना आता नागरिकांना, तरुणांना मतदानासाठी आवाहन करणार आहे.
Ayushmann Khurrana : बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराना (Ayushmann Khurrana) हा आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखला जातो. आयुष्यमान खुराना अनेकदा सामाजिक मुद्यावरही भाष्य करतो. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुष्यमानला मोठी जबाबदारी मिळाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आयुष्यमान खुरानाला युथ आयकॉन म्हणून नियुक्त केले आहे. आता आयुष्यमान खुराना आता नागरिकांना, तरुणांना मतदानासाठी आवाहन करणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आयुष्यमान खुरानाचा व्हिडीओ रिलीज केला. या व्हिडिओमध्ये यूथ आयकॉन आयुष्मान खुराना लोकांना मतदानासाठी आवाहन करताना दिसत आहे. आगामी 2024 लोकसभा निवडणुकीत तरुणांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यासाठी आणि संवेदनशील करण्यासाठी आयुष्मान खुराना यांची निवड भारतीय निवडणूक आयोगाने केली आहे. या मोहिमेद्वारे आयुष्मान आपल्या देशातील तरुणांना विनंती करेल की त्यांनी पुढे येऊन संसदेत आपल्या देशाचे पुढचे नेते निवडण्यासाठी आपला हक्क बजावावा.
मतदान का करावे? आयुष्यमानने सांगितले कारण...
या व्हिडिओमध्ये आयुष्मान मतदान न करण्याच्या अनेक कारणांची चर्चा करताना दिसत आहे. एक मतही दिले नाही तर काय होईल, असे लोकांना वाटते. 'मतदान न करण्यासाठी 101 कारणे आहेत, पण मतदान करण्यासाठी एकच कारण पुरेसे आहे आणि ते म्हणजे आपली जबाबदारी, देशासाठी आणि आपल्या भविष्यासाठी.' असे आयुष्यमान खुराना सांगताना दिसत आहे.
View this post on Instagram
प्रत्येक मताचे महत्त्व....
आयुष्यमानने सांगितले की, प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा आणि राष्ट्र निर्माणाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे. जागरुक नागरिकाचे हे कर्तव्य असल्याचे त्याने म्हटले. प्रत्येक मत महत्त्वाचे असून लोकशाही देशात मतदानाचे अधिकार बजावणे हे सशक्तिकरणाचे प्रतीक असल्याचेही तिने सांगितले.