एक्स्प्लोर

Delhi Election Results 2025: PM मोदींच्या 'त्या' कृतीमुळे दिल्लीची निवडणूक शेवटच्या क्षणी कशी फिरली? 'आप'च्या नेत्याचं मोठं वक्तव्य

Delhi Assembly Election Results 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने 46 जागांवर आघाडी घेतली आहे. तर आपला फक्त 24 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली: दिल्लीत गेल्या 15 वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे (AAP) एकहाती असलेले वर्चस्व झुगारुन लावत मोदी-शाहांचा भाजप राजधानीची सत्ता हस्तगत करणार, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल (Delhi Election Results 2025) शनिवारी जाहीर झाला. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. त्यानंतर चार तासांमध्ये हाती आलेल्या कलांनुसार, सध्याच्या घडीला भाजप 47 आणि आम आदमी पक्ष 23 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस (Congress) पक्षाला साधे खातेही उघडता आलेले नाही. दिल्लीत सत्तास्थापनेसाठी 37 हा बहुमताचा आकडा आहे. त्यामुळे हे कल कायम राहिल्यास भाजप दिल्लीत सत्ता स्थापन करेल, असे दिसत आहे. हा भाजपच्यादृष्टीने ऐतिहासिक विजय मानला जात आहे. या विजयामुळे तब्बल 26 वर्षांनी दिल्लीत भाजप सत्तेत येणार आहे. मात्र, भाजपच्या या विजयी घौडदोडीबद्दल आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांनी काही गंभीर आक्षेप उपस्थित केले.

धनंजय शिंदे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या तीन घटनांचा उल्लेख केला. केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली. दिल्ली विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी म्हणजे 5 फेब्रुवारीला सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये त्याची जाहिरात देण्यात आली होती. त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारचे कौतुक करण्यात आले होते. हा अनफेअर गेम आहे, असे धनंजय शिंदे यांनी सांगितले.

याशिवाय, 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत एनडीए सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सीतारामन यांनी 12 लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली होती. निम्नमध्यमवर्गीय आणि सामान्य नोकदारांच्यादृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता. याचा प्रभाव दिल्लीतील मध्यमवर्गीय मतदारांवर पडल्याचा आरोप 'आप'चे नेते धनंजय शिंदे यांनी केला. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाहीस्नान करण्यासाठी प्रयागराज गाठले. याठिकाणी मोदींनी संगमावर शाहीस्नान केले. दिल्ली विधानसभेचे मतदान सुरु असताना पंतप्रधान मोदी यांच्या शाहीस्नानाचे लाईव्ह प्रक्षेपण देशभरात सुरु होते. या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी मतदान सुरु असताना धार्मिक ध्रुवीकरणाचा डाव खेळला, असा आरोप धनंजय शिंदे यांनी केला. 

आणखी वाचा

दिल्लीत आम आदमी पार्टीला धक्का; अरविंद केजरीवालांच्या गुरुची मार्मिक प्रतिक्रिया, अण्णा हजारे म्हणाले....

Delhi Election Result 2025: दिल्लीकरांनी अरविंद केजरीवालांना दिला झटका; आपचा पराभव अन् भाजपाच्या विजयामागील 5 मोठी कारणं

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget