एक्स्प्लोर
प्लॅस्टिक सर्जरीच्या फोटोंबाबत आयेशा टाकिया म्हणते...
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आयेशा टाकियाने प्लॅस्टिक सर्जरी केल्याचे कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सर्जरी फसल्याने आयेशा विद्रुप दिसत असल्याच्या फोटोंनी इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. मात्र हे फोटो खरे नसल्याचं स्पष्टीकरण खुद्द आयेशाने दिलं आहे.
मोठे ओठ, बटबटीत डोळे, खप्पड चेहरा असं आयेशाचं रुप या फोटोंमध्ये पाहायला मिळत होतं. मात्र हेटर्सनी आपले फोटो मॉर्फ केल्याचं आयेशाने इन्स्टाग्राम पोस्टमधून सांगितलं आहे. 'ऑनलाईन ट्रोलिंगने नवी पातळी गाठली आहे. मात्र मी रोज सोशल मीडियावर असल्यामुळे हा प्रकार माझ्या चटकन लक्षात आला' असं आयेशा म्हणते.
'सुदैवाने इन्स्टाग्रामवर माझे प्रचंड फॉलोवर्स आहेत. त्यांचा माझ्यावर विश्वास असल्याने त्यांनी या अफवांवर विश्वास ठेवला नाही आणि मला पाठिंबा दिला.' #DontCareAboutFalseRumours अशा हॅशटॅगसह आयेशाने चाहत्यांचे आभारही मानले.
आयेशा टाकियाने 'टारझन द वंडर कार' या चित्रपटातून 2004 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिचे डोर, सोचा न था, शादी से पहले, वाँटेड, सन्डे यासारखे अनेक चित्रपट गाजले आहेत. ट्विटर, इन्स्टाग्रामवर ती अॅक्टिव्ह असली तरी गेल्या चार वर्षांत ती मोठ्या पडद्यावर झळकलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement