'Brahmastra 2' कधी रिलीज होणार? अयान मुखर्जीचा खुलासा; म्हणाला...
Brahmastra 2 : अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र 2 आणि 3'च्या शूटिंगला एकत्र सुरुवात होणार आहे.
Ayan Mukerji Brahmastra 2 : अयान मुखर्जीचा (Ayan Mukerji) 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) हा सिनेमा 2022 मध्ये सुपरहिट ठरला. या सिनेमाने जवळपास 400 कोटींची कमाई केली. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि ते 'ब्रह्मास्त्र 2'ची (Brahmastra 2) प्रतीक्षा करू लागले. आता नुकत्याच एका मुलाखतीत अयान मुखर्जीने 'ब्रह्मास्त्र 2'बद्दल भाष्य केलं आहे.
अयान मुखर्जी काय म्हणाला?
'ब्रह्मास्त्र'च्या पुढील भागाबद्दल बोलताना अयान मुखर्जी म्हणाला, "ब्रह्मास्त्र 2' हा सिनेमा देवच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. 'ब्रह्मास्त्र 2' आणि 'ब्रह्मास्त्र 3'च्या शूटिंगला एकत्र सुरुवात होणार आहे. 'ब्रह्मास्त्र 2' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित व्हायला आणखी तीन वर्षे लागतील". त्यामुळे 2026 मध्ये 'ब्रह्मास्त्र 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अयान मुखर्जी पुढे म्हणाला,"ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या पुढील भागाच्या कथानकाचं काम सध्या सुरू आहे. या सिनेमावर आम्ही खूप मेहनत घेत आहोत. पहिल्या भागाच्या यशानंतर दुसऱ्या भागाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पुढचा भाग लवकर प्रदर्शित व्हावा अशी चाहत्यांची इच्छा आहे. पण चांगल्या सिनेमासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल. पुढच्या तीन वर्षात 'ब्रह्मास्त्र 2' प्रेक्षकांच्या भेटीला येईल".
'ब्रह्मास्त्र 2'च्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार
'ब्रह्मास्त्र 2' या सिनेमाच्या कथानकावर सध्या काम सुरू आहे. लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणा आहे. याबद्दल बोलताना रणबीर म्हणाला,"2023 च्या शेवटी किंवा 2024 च्या सुरुवातीला 'ब्रह्मास्त्र 2' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होऊ शकते.
View this post on Instagram
'ब्रह्मास्त्र' या सिनेमाची तगडी स्टारकास्ट होती. या सिनेमात आलिया भट्ट, रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होते. तर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉयदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. त्यामुळे आता 'ब्रह्मास्त्र 2'मध्ये कोणते कलाकार असतील याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
'ब्रह्मास्त्र' चा पहिला भाग 9 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात उत्कृष्ट व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला होता. या सिनेमात शिवा ही भूमिका रणबीरनं आणि ईशाची भूमिका आलियानं साकारली होती. या सिनेमाची निर्मिती 410 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली होती. आता 'ब्रह्मास्त्र 2'ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या