Sexual Harassment : बॉडीगार्डकडूनच प्रसिद्ध अभिनेत्रीचा लैंगिक छळ; सौंदर्यवतीने खुलासा करत सांगितले, "तो वारंवार मागून..."
Bodyguard Sexually Harass Actress : बॉडीगार्डकडूनच प्रसिद्ध अभिनेत्रीचा लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Bodyguard Sexually Harass Actress : मल्याळम चित्रपटसृष्टीत सध्या लैंगिक छळाच्या घटनांनी खळबळ माजली आहे. हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर मॉलिवूडमध्ये लैंगिक छळ आणि कास्टिंग काउचच्या मुद्द्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अनेक अभिनेत्रींनी समोर येत त्यांच्यासोबत घडलेल्या गैरवर्तनाबद्दल भाष्य केलं आहे. अनेक दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शकांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले असून एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
बॉडीगार्डकडूनच प्रसिद्ध अभिनेत्रीचा लैंगिक छळ
फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेकदा कास्टिंग काऊच आणि अभिनेत्रींसोबत गैरवर्तन किंवा लैंगिक छळ झाल्याच्या घटना समोर येतात. कार्यक्रमांमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी अशा घटना घडतात. याच कारणामुळे अभिनेत्री आपल्यासोबत बॉडीगार्ड ठेवतात, पण आपल्या सुरक्षेसाठी ठेवलेल्या बॉडीगार्डनेच अभिनेत्रीसोबत गैरवर्तन केलं. बॉडीगार्डने अभिनेत्रीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.
बॉडीगार्डचा अभिनेत्रीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श
टीव्हीवरील छोटी आनंदी म्हणजेच अविका गौरसोबतही धक्कादायक घटना घडली. हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत अविका गौरने हा धक्कादायक खुलासा केला आहे. अविका गौरनं यावेळी सांगितलं की, कझाकस्तानमध्ये तिच्यासोबत असे अनेकदा घडलं आहे. तिच्याच बॉडीगार्डने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. अविकानं सांगितलं "भारतात असं अनेक वेळा घडतं, पण कझाकिस्तानमध्येही माझ्यासोबत असं अनेकवेळा घडलं. काही बॉडीगार्ड नेहमीच तुमच्यासोबत असतात, पण त्यातील एखादा असा असतो की, जो स्मार्ट बनण्याचा प्रयत्न करतो."
अभिनेत्रीने खुलासा करत सांगितलं
अभिनेत्री अविका गौरने कझाकस्तानमध्ये घडलेल्या घटनेचा उल्लेख करताना सांगितलं की, ती एका कार्यक्रमात स्टेजकडे जात असताना तिच्याच बॉडीगार्डने तिला आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. अविका म्हणाली, "मला आठवतं की, मला मागून कोणीतरी हात लावला. मी मागे वळले, तेव्हा तिथे फक्त माझा बॉडीगार्ड होता. मी स्टेजवर जात होते तेव्हा कोणीतरी मला मागून स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होतं. तेव्हा तिथे बॉडीगार्डशिवाय इतर कुणीचं नव्हतं. पण मला आठवतं की, तो वारंवार तेच करत होता. पुढच्या वेळेस तो चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणारच होता इतक्यात मी त्याला थांबवलं."
अविका गौरने बॉडीगार्डवर आरडली. त्यानंतर बॉडीगार्डने तिची माफी मागितली. अविका म्हणाली की "हे खूप लाजिरवाणं आहे. मी फक्त त्याच्याकडे रागाने बघितलं आणि विचार केला, 'काय?' आणि त्याने फक्त माफी मागितली. त्यांच्या कृतीचा दुसऱ्या व्यक्तीवर काय परिणाम होतो ते माहित नसतं, असंही तिने यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :