एक्स्प्लोर

Avatar 3 : 'अवतार 3'ची रिलीज डेट जाहीर! 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Avatar 3 : 'अवतार : द वे ऑफ वॉटर' नंतर प्रेक्षक या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. लवकरच 'अवतार 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Avatar 3 : जेम्स कॅमेरॉन (James Cameron) दिग्दर्शित 'अवतार' आणि 'अवतार : द वे ऑफ वॉटर' (Avatar : The Way of Water) या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सिनेमानंतर चाहते आता 'अवतार 3'ची (Avatar 3) प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'अवातार 3' या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. सध्या या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू आहे. अशातच या सिनेमाचं दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी या सिनेमाच्या रिलीजबद्दल भाष्य केलं आहे. 'अवतार 3' हा सिनेमा खूपच खास असणार आहे. त्यामुळे या सिनेमात वेगळं काय पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

'अवतार 3' कधी रिलीज होणार? (Avatar 3 Release Date)

टीव्ही न्यूझीलँडला दिलेल्या मुलाखतीत जेम्स कॅमेरॉन म्हणले की,"प्रोस्ट प्रोडक्शनच्या कामात आम्ही दोन वर्ष खूप व्यस्त आहोत. त्यामुळे 2025 च्या नाताळात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. लवकरच नव्या कलाकृतींवर काम सुरू करू. तसेच न्यूझीलँडचं नागरिक होण्याचा विचार करत असल्याचंही ते म्हणाले". 'अवतार 3' हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करेल.

'अवतार 3'मध्ये काय खास असणार? 

'अवतार 3' या सिनेमात अग्नि तत्त्वाची सुरुवात आणि दोन नव्या संस्कृतीचा समावेश असणार आहे. आगीचं प्रतिनिधित्व ऐश पीएलद्वारा करण्यात येणार आहे. 'Na'vi'चा एक वेगळा दृष्टिकोन या सिनेमात पाहायला मिळेल. एक वेगळं विश्व या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

'अवतार 3' या सिनेमात सॅम वर्थिंगटन, जो सलदाना, सिगोरनी वीवर, स्टीफन लैंगसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.  तसेच या सिनेमात चार्ली चॅपलिन यांची नात ओना चॅपलिनदेखील झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

'अवतार'च्या सीक्वेलची चाहच्यांना उत्सुकता

'अवतार 2' हा सिनेमा 16 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. आता हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत पाहू शकतात. या सिनेमाचा तिसरा भाग 19 डिसेंबर 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यानंतर 21 डिसेंबर 2029 रोजी या सिनेमाचा चौथा भाग प्रदर्शित होईल. तर 19 डिसेंबर 2031 मध्ये या सिनेमाचा पाचवा भाग प्रदर्शित होऊ शकतो. 

संबंधित बातम्या

Avatar Sequels Release Date : 'अवतार'च्या सीक्वेलची रिलीज डेट ढकलली पुढे; 2025 मध्ये होणार प्रदर्शित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात?  पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला
पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात? पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला
Ajit Pawar: अजितदादा नवाब मलिकांसोबत स्नेहभोजनात एकाच पंगतीला बसले, मनमोकळ्या गप्पाही मारल्या, आता देवेंद्र फडणवीस काय करणार?
अजितदादा नवाब मलिकांसोबत स्नेहभोजनात एकाच पंगतीला बसले, मनमोकळ्या गप्पाही मारल्या, आता देवेंद्र फडणवीस काय करणार?
Narayan Surve :  कविवर्य नारायण सुर्वे यांच्या शब्दांची पुण्याई कामाला आली, चोराने डल्ला मारलेल्या वस्तू परत दिल्या, भावनिक चिठ्ठी लिहित म्हणाला....
कविवर्य नारायण सुर्वे यांच्या शब्दांची पुण्याई कामाला आली, चोराने डल्ला मारलेल्या वस्तू परत दिल्या, भावनिक चिठ्ठी लिहित म्हणाला....
तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Warkari Bus Accident | पंढरपूरला जाणाऱ्या खाजगी बसचा अपघात, 5 वारकऱ्यांचा मृत्यू, 30 जण जखमीABP Majha Headlines 07AM एबीपी माझा हेडलाईन्स 07 AM 16 July 2024 Marathi NewsPandharpur Bus Accident : पंढरपूरला जाणाऱ्या खासगी बसचा एक्सप्रेस वेवर भीषण अपघातChhagan Bhujbal Special Report :भेटीचं कारण; आरक्षण की राजकारण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात?  पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला
पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात? पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला
Ajit Pawar: अजितदादा नवाब मलिकांसोबत स्नेहभोजनात एकाच पंगतीला बसले, मनमोकळ्या गप्पाही मारल्या, आता देवेंद्र फडणवीस काय करणार?
अजितदादा नवाब मलिकांसोबत स्नेहभोजनात एकाच पंगतीला बसले, मनमोकळ्या गप्पाही मारल्या, आता देवेंद्र फडणवीस काय करणार?
Narayan Surve :  कविवर्य नारायण सुर्वे यांच्या शब्दांची पुण्याई कामाला आली, चोराने डल्ला मारलेल्या वस्तू परत दिल्या, भावनिक चिठ्ठी लिहित म्हणाला....
कविवर्य नारायण सुर्वे यांच्या शब्दांची पुण्याई कामाला आली, चोराने डल्ला मारलेल्या वस्तू परत दिल्या, भावनिक चिठ्ठी लिहित म्हणाला....
तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
Harshvardhan Patil on Ichalkaranji : हर्षवर्धन पाटलांकडून राजर्षी शाहूंच्या भूमीतील इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी; केलं अत्यंत वादग्रस्त विधान
हर्षवर्धन पाटलांकडून राजर्षी शाहूंच्या भूमीतील इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी; केलं अत्यंत वादग्रस्त विधान
संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा, जातीय तणावाला तेच जबाबदार; मुस्लिम बोर्डींगचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा, जातीय तणावाला तेच जबाबदार; मुस्लिम बोर्डींगचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
लाडकी बहीण योजनेसाठी 'नारीशक्ती दूत' ॲपवरुन अर्ज भरताना ही काळजी घ्या, तो एरर नाही
लाडकी बहीण योजनेसाठी 'नारीशक्ती दूत' ॲपवरुन अर्ज भरताना 'ही' काळजी घ्या, तो एरर नाही
'भावी मुख्यमंत्री' लिहिलेली वीणा नाना पटोलेंच्या गळ्यात; भुजबळ-पवार भेटीवरही परखड भाष्य
'भावी मुख्यमंत्री' लिहिलेली वीणा नाना पटोलेंच्या गळ्यात; भुजबळ-पवार भेटीवरही परखड भाष्य
Embed widget