Atul Kulkarni : 'मारलं की मरायचं असतं'; महात्मा गांधींवरील रील शेअर करत अतुल कुलकर्णीचं भिडेंना प्रत्युत्तर
Atul Kulkarni Reel : अभिनेता अतुल कुलकर्णीचं अस्वस्थ करणारं रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Atul Kulkarni On Sambhaji Bhide Statement : संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलच वातावरण तापलं आहे. मनोरंजन क्षेत्रातील मंडळीदेखील यावर व्यक्त होत आहेत. अभिनेता अतुल कुलकर्णीचं (Atul Kulkarni) अस्वस्थ करणारं रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अतुल कुलकर्णीने कवितेच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे. महात्मा गांधी यांची हत्या झाली असली तरी ते आपल्यातून गेलेले नाहीत. आजही त्यांची अनेकांना आठवण येते, असं त्यांनी या रीलच्या माध्यमातून अधोरेखित केलं आहे. अतुल कुलकर्णी यांचं अस्वस्थ करणारं रील सध्या सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे.
अतुल कुलकर्णीने रीलमध्ये काय म्हटलं आहे?
तू मर बुवा एकदाचा असं नसतं करायचं! मारलं की मरायचं!!
गोळ्या किती महाग असतात दरवर्षी घ्याव्या लागतात.
तू थकत कसा नाहीस? मरुन मरुन? बाप्पू...
असं नसतं करायचं, मारलं की मरायचं!
एकदा मारुन मेला नाहीस, अनेकदा टोचून विरला नाहीस
बदनाम करुनही बधत नाहीस, असं त्यांना पुरुन उरायचं नसतं
मारलं की निमुट मरायचं असतं
तू ना... एक संधी देऊन तर बघ, नोटांवरुन जाऊन तर बघ
ती सबकी सन्मती घालवून तर बघ, असा खुनाचाच वध करायचा नसतो.
जीव घेतला की सोडायचा असतो, असं त्यांना पुरुन उरायचं नसतं.
मारलं की निमूट मरायचं असतं... पुढच्या वर्षी नक्की मर
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे सांगितले जाते. पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नाहीत. तर एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील आहेत असं धक्कादायक वक्तव्य भिडे यांनी केलं आहे. त्यामुळे राजकारण चांगलच तापलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विविध स्तरातून टीका होत आहे.
अतुल कुलकर्णीबद्दल जाणून घ्या... (Who Is Atul Kulkarni)
अतुल कुलकर्णीची 'सिटी ऑफ ड्रीम्स' या बहुचर्चित वेबसीरिजचा तिसरा सीझन गेल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सीरिजचे सर्व सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या सीरिजची चांगलीच चर्चा झाली होती. अतुल कुलकर्णीने मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीतही चांगलं काम केलं आहे.
संबंधित बातम्या