Ashrunchi Zali Phule : सुबोध भावेच्या 'अश्रुंची झाली फुले' नाटकाचा परदेशात हाऊसफुल्ल प्रयोग
Ashrunchi Zali Phule : 'अश्रुंची झाली फुले' या नाटकाचे सध्या परदेशातील विविध शहरात प्रयोग होत आहेत.
Ashrunchi Zali Phule : अभिनेता सुबोध भावेच्या (Subodh Bhave) 'अश्रुंची झाली फुले' (Ashrunchi Zali Phule) या नाटकाचे सध्या जोरदार प्रयोग होत आहेत. सध्या परदेशातदेखील या नाटकाचे हाऊसफुल्ल प्रयोग होत आहे. सुबोध भावेने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे.
'अश्रुंची झाली फुले' या नाटकाचे सध्या परदेशातील विविध शहरात हाऊसफुल्ल प्रयोग होत आहेत. सुबोध भावेने सोशल मीडियावर मराठीमध्ये 'हाऊसफुल्ल' लिहिलेल्या बोर्डाचा फोटो आणि प्रेक्षकांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने लिहिले आहे,'अश्रूंची झाली फुले' नाटकाचा शिकागोचा प्रयोग हाऊसफुल्ल. तसेच त्यांनी प्रेक्षकांचेदेखील आभार मानले आहेत.
View this post on Instagram
'अश्रुंची झाली फुले' या नाटकाचा सध्या परदेशी दौरा सुरू आहे. परदेशातील विविध शहरांत नाटकाचे प्रयोग होत आहेत. या नाटकात सुभोध भावे मुख्य भूमिकेत असून शैलेश दातार, सीमा देशमुख आणि उमेश जगतापदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. प्रतिमा कुलकर्णी यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.
संबंधित बातम्या