एक्स्प्लोर

Asha Bhosale : 'लग्न झाल्यानंतर बायकांचं वजन वाढतं, पिझ्झा सोडा भाकरी खा'; आशा भोसलेंनी दिल्या फिटनेस टिप्स

जनरेशन XL या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये आशा भोसले (Asha Bhosale) यांनी काही फिटनेसच्या टिप्स दिल्या.

Asha Bhosale :  प्रसिद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosale)  यांचा चाहता वर्ग मोठा आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये आशा यांनी त्यांच्या बालपणीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. तसेच 'पिझ्झा खाणं सोडा आणि भाकरी खा', असंही आशा भोसले यांनी सांगितलं.

प्रोफेसर संजय बोराडे यांच्या जनरेशन XL या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल (23 मे) पार पडला. जनरेशन XL या लहानमुलांमधील स्थुलता या विषयावरील पुस्तक आहे.  या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) हे उपस्थितीत  होते. लोअर परळच्या कोरम क्लबमध्ये हा सोहळा पार पडला असून या कार्यक्रमामध्ये बोलताना आशा भोसले यांनी काही फिटनेस टिप्स दिल्या आहेत. 

बालपणीच्या आठवणींना उजाळा

कार्यक्रमामध्ये आशा भोसले म्हणाल्या,'बालपणी जास्त जाड नव्हते. पण गोड बेबी होते. दीदी मला कडेवर घेऊन जायची तिला मी खूप आवडत होते  सगळ्यांनाच जाड मुलं आवडतात. तो जाडपणा बरेच वर्ष राहिला. त्यानंतर उंचीच्या मानानं वजन जास्त झालं होतं. ते वजन कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न केले.चार- पाच गाणी दिवसातून गायचे. काही  खाल्ल नाही तर गाता येत नव्हतं. पण 60 वर्षाची असताना माझं वजन 65 किलो होतं. ते मी आत्तापर्यंत तेवढंच ठेवलं आहे.'

सांगितला अमेरिकेतील किस्सा
' मी जेव्हा अमेरिकेत होते तेव्हा मी एकदा काही बायकांना रडताना पाहिलं. त्यांनी जेव्हा त्यांची मुलं दाखवली तेव्हा मला काळालं की ती मुलं खूप जाड होती. त्या मुलाला चालता देखील येत नव्हतं. ते पाहून मी थक्क झाले. मी त्यानंतर माझ्या सूनेला फोन केला आणि तिला सांगितलं की, माझ्या नातवाला पाकिटामधलं काही खायला देऊ नको फक्त वरण भात, पोळी दे. लहान मुलांचे सोडा आपण सर्वच जाड आहोत. सर्वांनी चालायला हवं तसेच स्वत:साठी वेळ काढायला हवा. असं तुम्ही का करत नाही?' असंही आशा भोसले म्हणाल्या.

दिल्या फिटनेस टिप्स

आशा भोसले यांनी काही फिटनेस टिप्स देखील दिल्या आहेत. त्या म्हणाल्या, लहान मुलं तुमचं पाहून खातात. तुम्ही जर पिझ्झा खाल्ला तर लहान मुलं पण खाणार. तुम्ही भाकरी का खात नाही? लग्न झाल्यानंतर मुलींचे वजन वाढते. मी मुलींना म्हणलं मी तुम्हाला लग्नामध्ये पाहिलं पण मी तुम्हाला ओळखलं नाही. लग्ननंतर बायकांचे वजन वाढते. माझी आई म्हणायची पाच इंद्रियांना सांभाळायची गरज नाही. एकच इंद्रिय सांभाळा ते म्हणजे जीभ. खाणं चांगलं असेल तर तुम्ही सुंदर दिसाल. मी सगळी काम केली आहे. मी विहीरीमधील पाणी देखील काढलं आहे.'

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Bramayugam National Award Film: 25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 'या' ब्लॅक अँड व्हाइट हॉरर फिल्मसाठी 74 वर्षांच्या अभिनेत्यानं पटकावलेला नॅशनल अवॉर्ड
25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 74 वर्षांच्या अभिनेत्याची ब्लॉकबस्टर फिल्म, पाहिलीय का?
OTT Trending Movie: 100 कोटींच्या पौराणिक चित्रपटाचा OTTवर दबदबा;  'बॉक्स ऑफिसवर अपयशी, आता मिळवतोय प्रेक्षकांची पसंती
100 कोटींच्या पौराणिक चित्रपटाचा OTTवर दबदबा;  'बॉक्स ऑफिसवर अपयशी, आता मिळवतोय प्रेक्षकांची पसंती
Aamchya Ladkya Naik Bai Marathi Serial Track: भूमिकेसाठी भीतीवर मात… स्टार प्रवाहवरच्या नव्या मालिकेत झळकणार 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली...
भूमिकेसाठी भीतीवर मात… स्टार प्रवाहवरच्या नव्या मालिकेत झळकणार 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली...
Actor Sudesh Berry On Pm Narendra Modi: 'पंतप्रधान मोदी विष्णुचे अवतार, मला त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचंय...'; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
'पंतप्रधान मोदी विष्णुचे अवतार, मला त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचंय...'; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Mallikarjun Kharge : प्रधानांचा राजीनामा घेऊन मोदींनी खुर्ची वाचवली, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसाठी अमित शाहांनी राजीनामा द्यावा : मल्लिकार्जुन खरगे
अमित शाहांनी राजीनामा द्यावा, ते देत नसतील तर मोदींनी त्यांना हटवावं: मल्लिकार्जुन खरगे
Kalyan Court Summons Uddhav Thackeray And Eknath Shinde: उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचे थैमान! पुरामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला, तर अमरावतीच्या मेळघाटात पावसाचं रौद्ररूप, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचे थैमान! पुरामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला, तर अमरावतीच्या मेळघाटात पावसाचं रौद्ररूप, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला
OTT Trending Movie: 100 कोटींच्या पौराणिक चित्रपटाचा OTTवर दबदबा;  'बॉक्स ऑफिसवर अपयशी, आता मिळवतोय प्रेक्षकांची पसंती
100 कोटींच्या पौराणिक चित्रपटाचा OTTवर दबदबा;  'बॉक्स ऑफिसवर अपयशी, आता मिळवतोय प्रेक्षकांची पसंती
Bramayugam National Award Film: 25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 'या' ब्लॅक अँड व्हाइट हॉरर फिल्मसाठी 74 वर्षांच्या अभिनेत्यानं पटकावलेला नॅशनल अवॉर्ड
25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 74 वर्षांच्या अभिनेत्याची ब्लॉकबस्टर फिल्म, पाहिलीय का?
मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; विदर्भातही मुसळधार पाऊस, सिपना नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; विदर्भातही मुसळधार पाऊस, सिपना नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
Embed widget