Aryan Khan Instagram: आर्यनने घरी परतल्यानंतर 24 तासांच्या आत उचलले 'हे' पाऊल
Aryan Khan Instagram: शाहरुख खान आणि गौरी खान (Shahrukh Khan And Gauri Khan) चा मुलगा आर्यन खानची क्रूझ ड्रग्ज प्रकरणातून जामिनावर सुटका झाली आहे. आर्यन सध्या त्याच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे.
Aryan Khan Instagram DP : शाहरुख खान (Shahrukh Khan) चा मुलगा आर्यन खानची (Aryan Khan) तीन आठवड्यांनी तुरुंगातून सुटका झाली आहे. आर्यन सध्या त्याच्या घरी मन्नतवर कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. आर्यनची जामिनावर सुटका झाल्यामुळे शाहरुख खान आणि गौरी खान सध्या आनंदात आहेत. क्रूझ ड्रग्ज प्रकरणातून सुटका होऊन आर्यन खान घरी परतला तेव्हा आर्यनच्या कुटुंबियांसोबत शाहरुखच्या चाहत्यांनीदेखील मन्नतवर तुफान गर्दी केली होती. घरी परतल्यानंतर 24 तासांच्या आत आर्यन खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील डीपी बदलला आहे.
आर्यन खान तुरुंगात असल्यामुळे मागील काही दिवस शाहरुख खान आणि गौरी खान प्रचंड निराश दिसून येत होते. आर्यनची सुटका होण्यासाठी ते प्रयत्न करत होते. पण आर्यनला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत होता. आर्यनला 'तारीख पे तारीख' चा सामना करावा लागत होता. आर्यनला जामीन मिळाल्यानंतरदेखील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने ती रात्रदेखील आर्यनला तुरुंगातच घालवावी लागली होती. घरी परतल्यानंतर आर्यन भाऊक दिसून येत होता.
आर्यननंतर मुनमुन आणि अरबाजचीही सुटका; प्रक्रियापूर्ण झाल्यानंतर आर्थर रोड जेलमधून बाहेर
आर्यनने उचलले टोकाचे पाऊल
घरी परतल्यानंतर आर्यनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरील त्याचा डीपी बदलला आहे. आर्यनच्या डीपीमध्ये आता कोणताही फोटो दिसत नाही. तसेच आर्यनने त्याचे काही जुने फोटोदेखील काढून टाकले आहेत. आर्यनने असे का केले ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कैदींना केले मदतीचे आवाहन
आर्यन तुरुंगात असल्याने काही कैदींसोबत त्याची ओळख झाली होती. दरम्यान त्या कैदींच्या कुटुंबियांना मदत करण्याचे आवाहन आर्यनने केले. तसेच कैद्यांच्या मदतीसाठी आर्यन आवाज उठवणार आहे. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर घरी जाण्याआधी आर्यनने कैदींची भेट घेतली होती.