एक्स्प्लोर

आर्यननंतर मुनमुन आणि अरबाजचीही सुटका; प्रक्रियापूर्ण झाल्यानंतर आर्थर रोड जेलमधून बाहेर

 क्रूझ पार्टी प्रकरणी (Mumbai Cruise Drug Case) अटक झाल्यानंतर, 26 दिवसांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची (Aryan Khan) अखेर काल जामीनावर सुटका झाली.

Munmun Dhamecha and Arbaaz Merchant Release:  क्रूझ पार्टी प्रकरणी (Mumbai Cruise Drug Case) अटक झाल्यानंतर, 26 दिवसांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची (Aryan Khan) अखेर काल जामीनावर सुटका झाली. पण त्याच्यासोबत अटकेत असलेल्या मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनी औपचारिक प्रक्रियेची पूर्तता  केली नव्हती. त्यामुळे त्यांना जामीन मिळाला नव्हता. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार, वकिलाने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मॉडेल मुनमुनला जामीन मिळाला आहे. आर्यनसह अरबाज आणि मुनमुन यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. आर्यन खानसाठी अभिनेत्री जुही चावला जामीन देण्यासाठी पुढे आली होती. त्यानंतर इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखेर आर्यनची सुटका झाली. अरबाज आणि मुनमुनच्या कुटुंबातील व्यक्ती आणि मित्र मिळून एकूण 7 जण जामीनदार म्हणून उपस्थित होते. प्रत्येकी 15,000 रुपयांच्या जामीनावर त्यांची सुटका करण्यात आली. मुनमुनचे जामीनदार म्हणून तिचा भाऊ नातेवाईक आणि मित्र आले होते तर अरबाजचे जामीनदार म्हणून त्याची आई, भाऊ आणि इतर काही लोक आले होते. 

पाहूयात अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा कोण आहेत. 

अरबाज मर्चंट
अरबाज मर्चंट हा अभिनेता आहे. त्याचे पुर्ण नाव अरबाज सेठ मर्चेंट असे आहे. अरबाज हा आर्यनबरोबरच शाहरूखची मुलगी सुहानाचा देखील जवळचा मित्र आहे. अनेक वेळा सुहाना आणि आर्यनसोबत अरबाजने अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली आहे.  मुंबईमध्ये क्रूझ प्रकरणानंतर अरबाज आणि आर्यनचे पार्ट्यांमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. काही फोटोमध्ये अरबाज आणि आर्यन हे चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडेसोबत दिसत आहेत. अरबाजचे इन्स्टाग्रामवर 30 हजारपेक्षा अधिक फॉलोअर्स असून तो आर्यन खान, सुहाना खान, शनाया कपूर, अलाया एफ, अनन्या पांडे आणि अंजिनी धवन या प्रसिद्ध कलाकरांना फॉलो करतो.    

Aryan Khan : अखेर 26 दिवसांनी आर्यन खानची सुटका! किंग खानच्या चाहत्यांचा जल्लोष

मुनमुन धमेचा
मुनमुन धमेचा ही फॅशन मॉडेल आहे. एका रिपोर्टनुसार, ती मध्यप्रदेशमधील एका बिझनेस मॅनची मुलगी आहे. मुनमुन सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिला इन्स्टाग्रामवर 9402 फोलोवर्स आहेत.

Aryan Khan Bail: मुलगा आर्यनला जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खानचा पहिला फोटो समोर, काय म्हणाले सतीश मानशिंदे?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget