एक्स्प्लोर

Adipurush: 'आदिपुरुष' चित्रपटाच्या वादावर अरुण गोविल यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

‘रामायण’ मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) यांनी ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या रिलीजनंतर सुरु झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

Adipurush: आदिपुरुष (Adipurush)  हा चित्रपट काल (16 जून) प्रेक्षकांच्या भेटीस आला. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. पण सोशल मीडियावर मात्र अनेक नेटकऱ्यांनी या चित्रपटाला ट्रोल केलं. आदिपुरुष चित्रपटातील कलाकारांच्या लूकला आणि डायलॉग्सला सध्या अनेक नेटकरी ट्रोल करत आहे. या सर्व वादावर आता रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेमध्ये रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अरुण गोविल?

एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरुण गोविल म्हणाले ,"प्रेक्षकांनी त्यांचं मतं मांडलं आहे... रामायण हा भारतीय संस्कृतीचा वारसा आहे आणि आता ज्याप्रकारे (चित्रपट) याबद्दल बोलले जात आहे, हे जाणून घेतल्यानंतर मन दुखावले आहे. रामायणाची मूळ भावना आणि रुप बदलण्याची गरज नव्हती. रामायण हा आपल्यासाठी श्रद्धेचा आणि विश्वासाचा विषय आहे. त्याच्याशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करणे अस्वीकार्य आहे. चित्रपटाचे स्पेशल इफेक्ट्स आणि सादरीकरणाची बाब वेगळी आहे,पण महत्वाची बाब भूमिकांची मांडणी योग्य पद्धतीने करण्याची आहे. त्याबद्दल बरेच बोलले जात आहे, जे चिंताजनक आहे."

"राम, सीता, हनुमान यांना आधुनिकता आणि पौराणिक या गोष्टींच्या चौकटीत विभागणे चुकीचे आहे. त्या सर्वांचे स्वरुप आधीच ठरलेले आहे, मग तेच रुप चित्रपटात दाखवायला काय हरकत होती?" असंही अरुण यांनी सांगितलं.

अरुण गोविल म्हणाले की, "आदिपुरुष चित्रपटामध्ये रामायणाची कथा दाखवण्यापूर्वी  चित्रपटाच्या निर्मात्यांना लोकांच्या श्रद्धेच्या विषयाशी संबंधित असणारे रामायण कसे सादर करावे? याचा विचार केला पाहिजे होता. रामायणातील पूर्वीच्या प्रस्थापित असलेल्या भूमिकांमध्ये काय चूक होती? नवीन फॉरमॅटमध्ये प्रयोग करण्याची काय गरज होती? मूळ भावनांशी छेडछाड करून चित्रपटाच्या निर्मात्यांना काय सिद्ध करायचे होते?

अरुण म्हणाले की, "जर निर्मात्यांनी हा चित्रपट लहान मुलांसाठी बनवला असेल तर त्या मुलांना विचारा की, हा चित्रपट त्यांना आवडला की नाही?"

चित्रपटाच्या संवादांबद्दल अरुण गोविल म्हणाले की, "मला अशा प्रकारची भाषा आवडत नाही आणि मी नेहमीच संयमी भाषा वापरतो आणि अशा परिस्थितीत मी रामायणात अशा भाषेचे समर्थन करत नाही. 

"हॉलिवूडपासून प्रेरित असलेल्या कार्टून फिल्मप्रमाणे रामायण सादर करणे, हे कोणत्याही प्रकारे पचनी पडणारे नाही.  चित्रपटाच्या संशोधनाचा विचार करताना निर्मात्यांनी क्रिएटिव्ह लिबर्टी  घेतले आहे, परंतु जर ते चित्रपटात त्यांचे नवीन इनपुट घालत असतील तर ते योग्य नाही. आदिपुरुष चित्रपट बनवताना या चित्रपटाचे निर्माते काय विचार करत होते, हे मला कळले नाही." असंही अरुण गोविल यांनी सांगितलं. 

चित्रपटामधील कलाकारांबद्दल काय म्हणाले अरुण गोविल?

चित्रपटांमधील कलाकारांबाबत अरुण म्हणाले, "या सर्व गोष्टींमध्ये कलाकारांचा दोष नसतो, त्यांना दिलेली भूमिका, त्यांना देण्यात आलेलं स्वरुप हे चित्रपटाचे मेकर्स ठरवत असतात. "

बॉलिवूडमध्ये यापुढे रामायणावर चित्रपट बनवण्याच्या विचार करणाऱ्या निर्मात्यांना सल्ला देत अरुण म्हणाले , मी एवढेच सांगू इच्छितो की फिल्म मेकर्सनं रामायणाच्या मूळ स्वरूपाशी छेडछाड करु नये. अरुण गोविल यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे की, त्यांना  हा चित्रपट  अद्याप पाहिला नाही, पण याविषयी त्यांनी खूप काही वाचले आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Adipurush: आदिपुरुषच्या टीझरवर अभिनेते अरुण गोविल यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'धर्माची चेष्टा करू नका'

 

 

 


 

महत्त्वाच्या बातम्या

Sankarshan Karhade Grandfather: तेव्हा फोन नवीन आलेले, माझ्या फोनवर 17-18 मिस्ड कॉल आलेले, मी आईला फोन केला आणि म्हणालो....: संकर्षण कऱ्हाडे
तेव्हा फोन नवीन आलेले, माझ्या फोनवर 17-18 मिस्ड कॉल आलेले, मी आईला फोन केला आणि म्हणालो....: संकर्षण कऱ्हाडे
Girish Kulkarni on Nana Patekar Deool: 'देऊळ' सिनेमासाठी गिरीश कुलकर्णींना नाना पाटेकरच का हवे होते? सांगितला किस्सा; म्हणाले, 'नानांनी मला 6 महिने तंगवलं'
'देऊळ' सिनेमासाठी गिरीश कुलकर्णींना नाना पाटेकरच का हवे होते? सांगितला किस्सा; म्हणाले, 'नानांनी मला 6 महिने तंगवलं'
Uday Tikekar on Ashok Saraf Laxmikant Berde: 'अशोक मामा अन् लक्ष्मीकांत बेर्डे खूप सतवायचे, फायटिंग सीन करताना चिमटा...'; उदय टिकेकरांनी सांगितला सेटवरचा किस्सा
'अशोक मामा अन् लक्ष्मीकांत बेर्डे खूप सतवायचे, फायटिंग सीन करताना चिमटा...'; उदय टिकेकरांनी सांगितला सेटवरचा किस्सा
Shweta Keswani Supports Shahana Goswami: एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत नातं असेल, तर त्यात अडचण काय? अभिनेत्रीचं ओपन रिलेशनशिप्सवर बेधडक वक्तव्य, म्हणाली...
एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत नातं असेल, तर त्यात अडचण काय? अभिनेत्रीचं ओपन रिलेशनशिप्सवर बेधडक वक्तव्य, म्हणाली...

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Embed widget