एक्स्प्लोर

Akshay Waghmare : डॅशिंग लूक, करारीपणा अन्...; 'डॅडी' अरुण गवळींच्या जावयाने 'खुर्ची' सिनेमासाठी वाढवलं 'इतके' किलो वजन

Akshay Waghmare : 'डॅडी' अरुण गवळी यांचा जावई अक्षय वाघमारे 'खुर्ची' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Akshay Waghmare : अंडरवर्ल्ड डॉन, डॅडी अरुण गवळी (Arun Gawli) यांचा जावई अक्षय वाघमारे (Akshay Waghmare) मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. सिनेमे, मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. आता त्याचा आगामी 'खुर्ची' (Khurchi) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमासाठी अक्षयने खूप मेहनत घेतली आहे. तसेच पाच किलो वजनही वाढवलं आहे.

कलाकार म्हटलं की त्यांचा व्यायाम हा सर्वप्रथम आला. असं असलं तरी अनेकदा हे कलाकार वजनावरून ट्रोल होताना पाहायला मिळतात. नेहमीच प्रत्येक कलाकार फिट रहाण्यासाठी धडपड करताना पहायला मिळतो. भूमिकेला साजेसं दिसण्यासाठी ही कलाकार मंडळी कसून मेहनत घेताना पाहायला मिळतात. ही घेतलेली मेहनत आपण मोठ्या पडद्यावर नेहमीच पाहतो.

'खुर्ची' सिनेमातील भूमिकेसाठी अक्षय वाघमारेची विशेष मेहनत

मराठमोळा अभिनेता अक्षय वाघमारेने आता वजन वाढवलं असल्याचं समोर आलं आहे. वजन कमी करण्याबाबत अनेकदा आपण ऐकतो पण वजन वाढवण्याबाबत क्वचितचं ऐकायला मिळतं. मराठमोळा अभिनेता अक्षय वाघमारे याने त्याच्या आगामी 'खुर्ची' या सिनेमातील भूमिकेसाठी तब्बल पाच किलो वजन वाढवलं असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर रावडी अशा भूमिकेला साजेसं असं मसल गेन ही त्याने केलेलं पाहायला मिळतंय. पाच किलो वजन वाढवून व मसलवर विशेष काम करून अक्षयने पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये छाप पाडली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Planet Marathi प्लॅनेट मराठी (@planet.marathi)

'खुर्ची' या सिनेमात अक्षयची रावडी भूमिका असलेली पाहायला मिळणार आहे. अक्षयच्या या आगामी सिनेमासाठी भूमिकेसाठी अक्षयची मेहनत अर्थात वाखाणण्याजोगी आहे. याबाबत बोलताना अक्षय म्हणाला,"एखाद्या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेणं हे अर्थात आव्हानात्मक असतं. 'खुर्ची' या माझ्या सिनेमातील भूमिकेसाठी मी तब्बल पाच किलो वजन वाढवलं, आणि मसल गेन करण्यासाठी विशेष मेहनत घेतली". 

अक्षय पुढे म्हणाला,"विशेष म्हणजे हे माझ्याकडून करून घेण्यात मला मदत केलेल्या सर्वांचा मी आभारी आहे. कारण माझी भूमिका तंतोतंत मांडण्यात सर्वांचा खारीचा वाटा आहे, असं मला वाटतं. तुम्ही आजवर खूप प्रेम माझ्यावर केलं आहात नक्कीच तुम्ही माझ्या खुर्ची सिनेमातील भूमिकेवरही तितकंच प्रेम कराल अशी आशा करतो". अक्षयची ही दमदार भूमिका येत्या 12 जानेवारी 2024 रोजी मोठ्या पडद्यावर पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Akshay Waghmare : 'डॅडी' अरुण गवळींचा जावई म्हणतोय,"ही खुर्चीची लढाई आहे, इथं रक्त सांडल्याशिवाय तख्त मिळत नाही"; नेमकं प्रकरण काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
ही तर संस्थात्मक हत्या, सत्तेकडून गुन्हेगारांना संरक्षण, भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस; राहुल गांधींचा हल्लाबोल
ही तर संस्थात्मक हत्या, सत्तेकडून गुन्हेगारांना संरक्षण, भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस; राहुल गांधींचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar Rains: 8 दिवसांपूर्वी 8 मृत्यू, तरीही चांदसेली घाट 'जैसे थे', दरड कोसळून वाहतूक ठप्प
Pandharpur : Vitthal मंदिराचे 24 तास दर्शन सुरु, समिती अध्यक्षांची माहिती
Farmer Distress: 'तोंडातला घास निसर्गाने हिरावला', Gondia तील अवकाळी पावसाने नुकसान
Tourist Rush :Diwali सुट्टीच्या शेवटच्या वीकेंडला Raigad वर पर्यटकांची गर्दी,वाहन पार्किंगच्या रांगा
Nalasopara Drug : नालासोपाऱ्यात 14 कोटींची MD Drugs फॅक्टरी उद्ध्वस्त, Mumbai Police ची मोठी कारवाई!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
शाहरुख, आमिरसोबत एकाच स्टेजवर अन् एक शब्द बोलताच सलमान खान पाकिस्तानकडून थेट दहशतवादी घोषित; नेमकं घडलं तरी काय?
आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
आणखी एक शांतता.. सतीश शाह यांच्या निधनाने बिग बीही सुन्न, माधुरी, हृतिकसह अनेक दिग्गजांनी भावनांना वाट मोकळी करून दिली
ही तर संस्थात्मक हत्या, सत्तेकडून गुन्हेगारांना संरक्षण, भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस; राहुल गांधींचा हल्लाबोल
ही तर संस्थात्मक हत्या, सत्तेकडून गुन्हेगारांना संरक्षण, भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस; राहुल गांधींचा हल्लाबोल
पुढील आठवड्यात देशभरात मतदारयाद्या सुधारणा कार्यक्रम सुरु होणार? आगामी वर्षात पाच राज्यात निवडणूक रणधुमाळी
पुढील आठवड्यात देशभरात मतदारयाद्या सुधारणा कार्यक्रम सुरु होणार? आगामी वर्षात पाच राज्यात निवडणूक रणधुमाळी
Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol: रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर आणखी एक सनसनाटी आरोप, गोखलेंसाठी केंद्रीय मंत्रि‍पदाचा गैरवापर, नेमकं काय घडलं?
धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर आणखी एक आरोप, गोखलेंसाठी केंद्रीय मंत्रि‍पदाचा गैरवापर, नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : आता मुहूर्त काढायला बामणाची वाट पाहता का? आजवर इतका लबाड मुख्यमंत्री देशाने पाहिला नाही; कर्जमाफीच्या मुद्दयावरुन बच्चू कडूंनी ओढले टीकेचे आसूड
आता मुहूर्त काढायला बामणाची वाट पाहता का? आजवर इतका लबाड मुख्यमंत्री देशाने पाहिला नाही; कर्जमाफीच्या मुद्दयावरुन बच्चू कडूंचे टीकेचे आसूड
Jain Boarding House Land: पुण्यातील जैन बोर्डिंग जागा वादात आता आणखी एक ट्विस्ट! कर्ज दिलेल्या त्या दोन पतसंस्थांकडून गहाणखत थेट रद्दबातल
पुण्यातील जैन बोर्डिंग जागा वादात आता आणखी एक ट्विस्ट! कर्ज दिलेल्या त्या दोन पतसंस्थांकडून गहाणखत थेट रद्दबातल
Embed widget