पैशांच्या मोबदल्यात राजकीय पक्षांचा प्रचार, सनीपासून श्रेयसपर्यंत 30 बॉलिवूड कलाकार स्टिंगमध्ये अडकले
कोब्रा पोस्टने 'ऑपरेशन कराओके' नावाचं स्टिंग ऑपरेशन केलं. या स्टिंग ऑपरेशनअंतर्गत पोर्टलच्या रिपोर्टर्सनी पीआर कंपनीचे प्रतिनिधी म्हणून अभिनेते, गायक, डान्सर आणि टीव्ही कलाकारांच्या मॅनेजरशी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डील करण्यासाठी संपर्क साधला.
स्टिंग ऑपरेशनमध्ये सापडलेल्या सेलिब्रिटींचे व्हिडीओ कोब्रा पोस्टने ट्विटरवर शेअर केले आहेत. यानंतर अभिनेता सोनू सूदने परिपत्रक जाहीर करुन संबंधित प्रतिनिधींशी झालेला संवाद चुकीच्या पद्धतीने मांडल्यांचं म्हटलं आहे.#OperationKaraoke: Oberoi seeks required Data to make his messages look Factually Credible, something not paid for. “Aap data wagaireh bhi denge na...Data ke hissab se hum likh sakte hain … aisa lagna Nahi chahiye ki humein Bola gaya hai likhne ke liye” #BikaooBollywood pic.twitter.com/2SgD5TDMoN
— Cobrapost (@cobrapost) February 19, 2019
कोब्रा पोस्टच्या स्टिंग ऑपरेशननुसार, बऱ्याच सेलिब्रिटींनी प्रस्तावाला होकार देण्याआधी 2 लाखांपासून 50 लाख रुपयांच्या फीची मागणी केली. काहींनी तर आठ महिन्यांच्या करारासाठी 20 कोटी रुपयेही मागितले. फी रोख रकमेत दिली जाईल असं सांगितल्यावर कोणीही काळ्या पैशांना नाही म्हटलं नाही.#OperationKaraoke: Mahima Chaudhry while agreeing seeks to know the Budget “Jhoot mooth ke Tweet kitna milega … kya Budget lekar aaye ho?” #BikaooBollywood pic.twitter.com/rwls1HfmKW
— Cobrapost (@cobrapost) February 19, 2019
तर काही सेलिब्रिटींनी उत्साह दाखवण्यासाठी पैसे घेण्याआधीच ट्वीट केल्याचं कोब्रा पोस्टने म्हटलं आहे. मात्र काही सेलिब्रिटींनी राजकीय पक्षांना सोशल मीडियावर प्रमोट करण्यासाठी नकार दिल्याचंही कोब्रा पोस्टने सांगितलं. "आम्ही विद्या बालन, अर्शद वारसी, रजा मुराद आणि सौम्या टंडन यांच्याकडे गेलो असता त्यांनी थेट नकार दिला," असंही कोब्रा पोस्टने म्हटलं.Kailash Kher tells us that his agency will handle the Commercial aspects of the Deal, with a hidden agenda: “Haan, Hidden mein bhi wo batayenge commercial hum Nahi batayenge. Hum bas Haan ya Na kar sakte hain, ki ye kaam hum kar payenge ya Nahi kar payenge” #BikaooBollywood pic.twitter.com/RtiG1cXnKL
— Cobrapost (@cobrapost) February 19, 2019
जॅकी श्रॉफ, अनुपम खेर, सोनू सूद आणि विवेक ओबेरॉय यांच्यासह, मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे, सनी लिऑनी, शक्ती कपूर, अमीशा पटेल, टिस्का चोप्रा, राखी सावंत, पंकज धीर, निकितन धीर, पुनीत इस्सार, राजपाल यादव, मिनिषा लांबा, महिमा चौधरी, रोहित रॉय, अमन वर्मा, कोयना मित्रा आणि राहुल भट हे पैशांच्या मोबदल्यात राजकीय पक्षांचा प्रमोट करणारे ट्वीट करण्यास तयार झाले. याशिवाय गायक दलेर मेहंदी, मिका सिंह, अभिजीत भट्टाचार्य आणि बाबा सहगल, कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तव, कृष्णा अभिषेक, व्हीआयपी यांचाही यात समावेश आहे. तर टीव्ही कलाकार हितेन तेजवानी आणि त्याची पत्नी गौरी प्रधान हेदेखील या यादीत सामील आहे. "आम्ही एकही पैसा घेतलेला नाही, पण आम्ही पैसे घ्यावेत, जेणेकरुन ते आमचं स्टिंग करतील, असा कोब्रा पोस्टचा उद्देश होता. त्यांनी अर्धवट संभाषण दाखवून खोटे आरोप केले आहेत," असा दावा हितेन आणि गौरीने केला आहे.#OperationKaraoke: Agreeing to promote AAP on Social media, Actor & Director Shreyas Talpade asks how many Messages he is supposed to tweet, “Haan aur ye aapko kitne duration mein tweet lenge” #BikaooBollywood pic.twitter.com/aYKrG285w9
— Cobrapost (@cobrapost) February 19, 2019