Arjun Kapoor Corona Positive : कपूर कुटुंबात कोरोनाचा शिरकाव; अर्जुन, अंशुला आणि रियाला कोरोनाची लागण
Arjun Kapoor Corona Positive : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कपूरला कोरोनाची लागण झाली आहे.
Arjun Kapoor Covid Positive : सुपरस्टार अनिल कपूरची (Anil Kapoor) मुलगी रिया कपूर आणि तिचा पती करण बुलानीला (Karan Boolani) कोरोनाची लागण झाली आहे. सध्या दोघेही क्वारंटाईनमध्ये आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. रिया कपूर आणि करण बुलानी नुकतेच लग्नबंधनात अडकले होते.
रिया कपूरसह बॉलिवूड अभिनेता अर्जन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कपूरलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता अर्जुन कपूरची प्रेयसी मलायका अरोराचीदेखील कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने
अर्जुन कपूरच्या रहेजा ऑर्किड बिल्डिंगच्या बाहेर इमारत सील केल्याची माहिती देणारा फलकदेखील लावला आहे.
अर्जुन कपूर नाताळच्या सेलिब्रेशनसाठी रिया कपूरच्या घरी गेला होता. नुकतीच कपूर कुटुंबीयांनी नाताळच्या निमित्ताने अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती. अर्जुन कपूर आणि मलायका अरोराला याआधीदेखील कोरोनाची लागण झाली होती. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा 26 डिसेंबरला करिश्मा कपूरच्या घरी आयोजित केलेल्या नाताळ पार्टीमध्ये स्पॉट झाले होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. आज अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरचा वाढदिवस आहे. अर्जुनने सोशल मीडियाच्या माध्यमातून अंशुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अंशुलाला वाढदिवशी कोरोनाची लागण
आज अंशुलाचा वाढदिवस देखील आहे आणि नेमकी आजच तिला कोरोनाची लागण झाली आहे. अंशुला आणि अर्जुनने आज सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. परंतु, अद्याप त्यांनी कोरोना झाल्याबद्दल काहीही पोस्ट केलेले नाही किंवा कोणतीही माहिती दिलेली नाही.
संबंधित बातम्या
Dharmendra : चक्की पीसिंग...पीसिंग... धर्मेंद्र यांचा भन्नाट व्हिडीओ; सायकल चालवत दळलं धान्य
Lochya Zala Re : अंकुश, वैदेही आणि सिद्धार्थ यांचा 'लोच्या झाला रे' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस
Arjun Kapoor : अर्जुन कपूर कोट्यवधींचा मालक; लग्झरी गाड्या, आलिशान घर आणि बरंच काही
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha