Arbaaz Khan: 'सलमानचा भाऊ, मलायकाचा पती म्हटल्यावर...'; अरबाज खाननं व्यक्त केली खंत
अरबाजनं एका मुलाखतीमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगितलं. अरबाजनं सांगितलं की, मलायकाचा पती, सलमानचा (Salman Khan) भाऊ आणि सलीम खान (Salim Khan) यांचा मुलगा हे टॅग्स दिल्यावर त्याला वाईट वाटत होतं.

Arbaaz Khan: प्रसिद्ध अभिनेता अरबाज खाननं (Arbaaz Khan) बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून देखील काम केलं. वेगवेगळ्या चित्रपट, वेब सीरिजमधून अरबाज प्रेक्षकांच्या भेटीस येतो. अरबाजनं एका मुलाखतीमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगितलं. अरबाजनं सांगितलं की, मलायकाचा पती, सलमानचा (Salman Khan) भाऊ आणि सलीम खान (Salim Khan) यांचा मुलगा हे टॅग्स दिल्यावर त्याला वाईट वाटत होतं.
काय म्हणाला अरबाज?
एका मुलाखतीमध्ये अरबाजनं सांगितलं, एक काळ असा होता की, मी अस्वस्थ राहात होतो. जेव्हा मला सलीम खानचा मुलगा, सलमान खानचा भाऊ किंवा मलायका अरोराचा पती असे संबोधले जात होते तेव्हा मला खूप त्रास व्हायचा"
पुढे तो म्हणाला, 'यश हे फार कमी वेळेसाठी असते. माणूस कायम यशावर शिखरावर नसतो. मी एक अभिनेता म्हणून काही चांगले चित्रपट केले होते, मी दबंग चित्रपटात काम केले. जर मी चांगलं काम केलं नसतं तर मी आतापर्यंत निवृत्त झालो असतो. लोकांची मानसिकता बदलण्यात काही अर्थ नसतो.'
View this post on Instagram
मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी लग्नानंतर 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. 1998 साली अरबाज आणि मलायकाचे लग्न झाले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. लग्नाआधी दोघांनीही जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते. त्या दोघांना अरहान नावाचा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'तनाव' या वेब सीरिजमध्ये अरबाजनं काम केलं. अरबाजनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Malaika Arora : अरबाजसोबतच्या घटस्फोटानंतर अर्जुनला डेट करण्याबाबत मलायका म्हणाली...























