Salman Khan Security : सलमान खानची सुरक्षा व्यवस्था पाहून लॉरेन्स बिश्नोईलाही फुटेल घाम; ड्रोन, कमांडो अन् बॉडीगार्ड
Salman Khan Death Threat : अभिनेता सलमान खानला वारंवार जीवे मारण्याची धमकी मिळत असतानाही त्याने बुधवारी मतदानाचा हक्क बजावला.
Salman Khan Security : बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता सलमान खान अलिकडे चर्चेत आहे. सलमान खानला वारंवार जीवे मारण्याची धमकी मिळाल्या आहेत. अशातही सलमान खानने मतदान करत सामाजिक जबाबदारी पार पाडली. सलमान खान बुधवारी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचला. यावेळी सलमान खानची सिक्युरिटी पाहून सगळेच अवाक् झाले. सलमान चोख सुरक्षा बंदोबस्तात मतदान करण्यासाठी पोहोचला.
भाईजानची सुरक्षा व्यवस्था पाहून बिश्नोईलाही फुटेल घाम
अभिनेता सलमान खान बुधवारी, 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी घराबाहेर पडला. यावेळी तो कडेकोट बंदोबस्तात मतदान केंद्रावर पोहोचला. त्याची सुरक्षा एवढी कडेकोट होती की, हा आता चर्चेचा विषय बनला आहे. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्यापासून त्याच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती.
सलमान खानने बजावला मतदानाचा हक्क
View this post on Instagram
सलमान खानची सुरक्षा व्यवस्था
सलमान खान मतदानासाठी पोहोचला तेव्हा त्याच्यासाठी चोख बंदोबस्त पाहायला मिळाला. सलमान वांद्रे पश्चिम येथील माउंट मेरी कॉन्व्हेंट हायस्कूलमधील मतदान केंद्रावर पोहोचला तेव्हा त्याला सुरक्षा कर्मचारी आणि कारच्या ताफ्याने घेरलं होतं. सलमान खानच्या सुरक्षा व्यवस्थेने सर्वांचं लक्ष वेधलं. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओमध्ये सलमान खानच्या सुरक्षेत हायटेक ड्रोन आणि कमांडोचाही समावेश असल्याचं दिसत आहे.
ड्रोन, कमांडो अन् बॉडीगार्ड
मतदान केंद्रातून बाहेर पडताना सलमान खानचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यामध्ये तो राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि जीन्ससह काळी टोपी आणि सनग्लासेस घातलेला दिसत आहे. सलमान खान मतदान केंद्रावरुन बाहेर पडताना त्याने चाहत्यांना हात हलवून आणि फ्लाइंग किस देऊन अभिवादन केलं. सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्याला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्यामुळे त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आता त्यांच्यासोबत सुरक्षारक्षकांचा मोठा ताफा सर्वत्र फिरतो.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :
VIDEO : सलमान खानबद्दल अश्नीर ग्रोवरचं वक्तव्य व्हायरल होताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'भाईजान समोर माज उतरला'