A R Rahman on Chhaava: छावा संभाजी महाराजांचं शौर्य दाखवणारा चित्रपट, मराठी मनाचा ठाव घेणाऱ्या कलाकृतीला संगीत देणं माझं भाग्य, पण तो फूट पाडणारा; ए.आर. रेहमान काय म्हणाले?
रहमान यांनी या विभाजन करणारा सिनेमा” असल्याचं म्हटलं असून, त्यांच्या या वक्तव्यानंतर सगळीकडे त्यांची जोरदार चर्चा आहे.

AR Rahman on Chhava: ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांनी सध्याच्या चित्रपटसृष्टीतील प्रवाहावर परखड भाष्य केलं आहे. विकी कौशलची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘छावा’ चित्रपटाबाबत बोलताना रहमान यांनी या चित्रपटाला “विभाजन करणारा सिनेमा” असल्याचं म्हटलं असून, त्यांच्या या वक्तव्यानंतर सगळीकडे त्यांची जोरदार चर्चा आहे.
बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत ए.आर. रहमान यांनी ‘छावा’च्या आशयावर भाष्य केलं. ते म्हणाले, “हा चित्रपट विभाजन करणारा आहे. त्याने विभाजनाला भांडवल वापरलं आहे, असं मला वाटतं. मात्र त्याचा मूळ उद्देश शौर्य दाखवण्याचा आहे.” रहमान यांनी या चित्रपटासाठी आपली निवड का करण्यात आली, याबाबतही एक आठवण सांगितली.
छावा चित्रपट फूट पाडणारा...
पत्रकार हरून रशीद यांनी विचारलं तुम्ही अशा काळात काम करत आहात जिथे दिवसेंदिवस लोकांमध्ये मतभेद, फूट पडणारे वातावण वाढतंय. 15 वर्षांपूर्वी एखादा चित्रपट करताना माहित असायचं की या चित्रपटाचा उद्देश नकारात्मक आणि चुकीच्या उद्देशाने बनवलाय की नाही. पण आज हे ओळखणं फार अवघड झालेले दिसते . यावर ए आर रेहमान म्हणाले, "बरोबर आहे. काही चित्रपट वाईट हेतूने बनवले जातायत. मी अशा चित्रपटाचा भाग होतो. "
छावा चित्रपटाला तुम्ही दिलेल्या संगीताची चर्चा आहे. पण हा चित्रपट फूट पाडणारा आहे. यावर ए आर रेहमान म्हणाले, हो, हा लोकांमध्ये फूट पाडणारा चित्रपट आहे. त्यांनी खरंतर फसव्या गोष्टीचा फायदा घेतला. पण या चित्रपटाचा मूळ गाभा शौर्य दाखवणे आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शकालाही मी विचारलं होतं की हे गाणं मीच का करावं असं वाटतंय? त्यावर तेही म्हणाले होते की मला यासाठी फक्त तुम्हीच हवे आहात. छावाचं संगीत करतानाचा अनुभव आनंददायी होता. पण लोक अधिक हुशार आहेत. मला वाटतं लोक चित्रपट पाहून प्रभावित होतात पण लोकांना माहित असतं काय खरं आहे आणि कशात छेडछाड केली आहे.
प्रत्येक मराठ्याचा आत्मा दाखवणारा चित्रपट
छावा चित्रपटाविषयी बोलताना ते म्हणाले की, छावा चित्रपटातील सगळे पात्र हे सेलिब्रेट करण्यात आले आहेत. ही फिल्म प्रत्येक मराठ्याच्या शौर्याचे मिश्रण आहे.मराठी मनाचा ठाव घेणाऱ्या कलाकृतीला संगीत देणं माझं भाग्य आहे. या चित्रपटातून प्रत्येक मराठ्याचा आत्मा दाखवणारा हा चित्रपट आहे. यावेळी पत्रकार हरून रशीद यांनी म्हटलं की या चित्रपटात प्रत्येक नकारात्मक सीननंतर यातील पात्र सुभानल्ला, माशाल्ला, अहमदुलिल्ला म्हणताना दिसतात. यावर ए आर रहमान हे क्लिशे असल्याचं सुचवलं. ते म्हणाले, माझा लोकांवर अधिक विश्वास आहे. ते कुठल्याही चुकीच्या माहितीवरून प्रभावित होत नाहीत. माझा माणुसकीवर विश्वास आहे. लोक अतिशय हुशार आहेत. लोकांना अंतर्गत जाणीव असतात. त्यांच्या भावना असतात. श्रद्धा असते. दिवसाच्या शेवटी एक प्रश्न पडतो की मी किती लोकांचा द्वेष करू शकतो? हे आपल्या डोक्यातील ऍसिड आहे. हृदयात काम एक दैवी भावना असते. ती कुठल्याही देवाबद्दल असो. खरं सत्य आपल्या डोक्यात कायम असतं. त्यालाच अंतर्गत जाणीव म्हणतात. असं ए आर रहमान म्हणाले.























