Anushka Sharma: प्रेग्नन्सीच्या चर्चेदरम्यान अनुष्काची खास पोस्ट; नेटकऱ्यांनी शुभेच्छा द्यायला केली सुरुवात
Anushka Sharma: अनुष्कानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. अनुष्कानं ही पोस्ट शेअर करताच अनेक नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.
Anushka Sharma: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अनुष्का ही दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून होत आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा हे लवकरच दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. आशातच आता अनुष्कानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. अनुष्कानं ही पोस्ट शेअर करताच अनेक नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.
अनुष्काची पोस्ट (Anushka Sharma Post)
अनुष्काने सोशल मीडियावर प्रेग्नेंसी टेस्ट किटची जाहिरात शेअर केली आहे. अशात अनुष्काच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षा केला आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
अनुष्कानं शेअर केलेल्या जाहिरातीला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "म्हणजे तू पुन्हा गरोदर आहेस, अभिनंदन" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "पुन्हा एकदा अभिनंदन"
अनुष्कानं शेअर केलेल्या प्रेग्नेंसी टेस्ट किटच्या जाहिरातीला पाहिल्यानंतर अनुष्का आणि विराट हे दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत, असा अंदाज सध्या नेटकरी लावत आहेत. पण अनुष्का आणि विराट यांनी याबाबत अजून कोणतीही घोषणा केलेली नाही.
विरुष्काला काही दिवसांपूर्वी मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर पापाराझींनी स्पॉट केले होते, पण तेव्हा दोघांनीही पापाराझींना फोटो न काढण्याची विनंती केली होती. आम्ही याबाबत लवकरच घोषणा करणार आहोत, असंही त्यांनी त्यावेळी सांगितले होतं. याच कारणामुळे अनुष्काच्या प्रेग्नन्सीची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली.
2017 मध्ये विराटने अनुष्कासोबत लग्नगाठ बांधली.जानेवारी 2021 मध्ये अनुष्कानं मुलीला जन्म दिला. विरुष्कानं त्यांच्या मुलीचे नाव वामिका (Vamika Kohli) असे ठेवले आहे.
काही महिन्यांपूर्वी अनुष्का आणि विराट हे बंगळुरूमधील हॉटेलमध्ये स्पॉट झाले. या हॉटेलमधील विराट आणि अनुष्का यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.या व्हिडीओमध्ये विरुष्का हे ट्रेडिशनल आऊफिटमध्ये दिसली. यावेळी अनुष्का ही ओढणीनं बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत होती,अशा कमेंट नेटकऱ्यांनी विरुष्काच्या व्हायरल व्हिडीओला केल्या.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :