Vicky Kaushal-Katrina Kaif Marriage : विकी- कतरिना असणार विरूष्काचे शेजारी ; अनुष्का म्हणाली, 'आता आम्हाला...'
Anushka Sharma Post on Vicky Kaushal-Katrina Kaif Marriage : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा काल (9 डिसेंबर) विवाह सोहळा पार पडला.
Anushka Sharma Post on Vicky Kaushal-Katrina Kaif Marriage : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा काल (9 डिसेंबर) विवाह सोहळा पार पडला. राजस्थानमधील सवाई माधोपुर (Sawai Madhopur) मधील बरवाडा फोर्टमध्ये कतरिना आणि विकीचा लग्न सोहळा पार पडला. नुकतीच अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने विकी आणि कतरिनाला हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
अनुष्का शर्माची पोस्ट
अनुष्काने विकी आणि कतरिनाचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'दोघांचे अभिनंदन. तुमचे लग्न झालंय म्हणून मला खूप आनंद झाला आहे कारण आता तुम्ही लवकरच तुमच्या नव्या घरात शिफ्ट व्हाल.' पुढे अनुष्काने लिहीले, 'आता आम्हाला तुमच्या नव्या घराच्या कन्स्ट्रक्शनचा आवाज देखील येणार नाही.' अनुष्काच्या या पोस्टमधून असे लक्षात येते की विकी आणि कतरिना हे विरूष्काच्या घरा शेजारीच शिफ्ट होणार आहेत. एका रिपोर्टनुसार, विरूष्का यांच्या सि-फेसिंग फ्लॅट शेजारीच कतरिना आणि विकीने एका फ्लॅट भाड्याने घेतला आहे.
या कलाकरांनी केल्या विकी आणि कतरिनाच्या फोटोवर कमेंट्स
कतरिना आणि विकीच्या फोटोवर आलिया भटने कमेंट केली, 'तुम्ही दोघेही खूप सुंदर दिसत आहात.', तर प्रियांका चोप्राने कमेंट केली, 'आज मेरी यार की शादी है, दोघांना शुभेच्छा '. प्रियांका आणि आलियासोबतच दीपिका, मनीष मल्होत्रा, ऋतिक रोशन, जाह्नवी कपूर, श्वेता बच्चन, टाइगर श्रॉफ आणि परिणीति चोप्रा या सेलिब्रिटींनी देखील विकी आणि कतरिनाला सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
संबंधित बातम्या
katrina Vicky Wedding : कतरिना-विकीचा लग्नानंतरचा पहिला फोटो आला समोर
Vicky Kaushal-Katrina Kaif Marriage : कतरिना-विकीवर शुभेच्छांचा वर्षाव; बॉलिवूड कलाकारांच्या हटके कमेंट्स, करिनाची पोस्ट चर्चेत