एक्स्प्लोर

Anurag Kashyap : अनुराग कश्यप तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार? लेकीने केली भावंडांची डिमांड

Anurag Kashyap : अनुराग कश्यपने नुकतीच लेक आलियाच्या पॉडकास्टला हजेरी लावली. दरम्यान आलियाने आपल्या वडिलांना वैयक्तिक आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारले.

Anurag Kashyap : बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अनुराग कश्यप आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. अनुरागने दोनदा लग्न केलं आहे. फिल्म एडिटर आरती बजाजसोबत त्याने पहिलं लग्न केलं होतं. तर दुसरं लग्न अभिनेत्री कल्कि कोचलिनसोबत केलं होतं. दोन्ही लग्न टिकले नाहीत. आता अनुरागच्या मुलीने त्याला तिसऱ्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला आहे. पण आता त्याने हे होऊ शकत नाही... मी वाईट वडील आहे असं उत्तर दिलं आहे. 

अनुराग तिसरं लग्न करणार? (Anurag Kashyap on Wedding)

अनुराग कश्यपने लेक आलिया कश्यपच्या पॉडकास्टला हजेरी लावली होती. दरम्यान आलियाने त्याच्यासोबत दोन्ही लग्न फेल होण्याबदद्ल भाष्य केलं. तसेच तिसऱ्यांदा लग्न करण्याची इच्छा आहे का? असा प्रश्नही विचारला. यावर अनुराग म्हणाला,"मला वाटतं की मी रिलेशनशिप व्यक्ती नाही. कामाला मी प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतो. मी यूरोपियन असतो आणि तिथेच राहून सिनेमा बनवत असतो तर कदाचित माझं रिलेशन खूप चांगलं असतं. तिथे रॉयल्टी सिस्टम असते आणि पैसेही येतात. पण इथे रॉयल्टी किंवा अशी काही सिस्टमदेखील नाही. मला वेगवेगळे चित्रपट बनवायला आवडतात".

अनुरागने स्वत:ला वाईट ठरवलं...

अनुरागने पैरेंटिंगबद्दलही भाष्य केलं. फिल्मफेअरने स्वत:ला वाईट वडील असल्याचं ठरवलं. अनुराग कश्यप म्हणाला,"मला वाटतं की मी तुझ्यासोबत वडिलांपेक्षा मित्रासारखा राहिलो आहे. मला माहिती आहे की वडिल म्हणून मी कमी पडलो आहे. तुझी आई मात्र आईसारखीच राहिली आहे. काही वर्षे ती माझीदेखील आई बनून राहिली आहे. त्यामुळेच मला वाटतं की मी वाईट वडील आहे". 

लेकीला हवाय भाऊ किंवा बहिण

आलिया पुढे मजा करत म्हणाली,"मला नेहमीच एक भाऊ किंवा बहीण हवा होता. मला तेवढचं हवंय. लहानपणापासून मी एकुलती एक मुलगी आहे. मला वाटलं होतं की तू किंवा आई घटस्फोटानंतर पुन्हा कोणासोबत रिलेशनमध्ये येतील आणि मला एक भाऊ किंवा बहीण मिळेल". याचं उत्तर देत अनुराग म्हणतो,"आता तुझा बाबा म्हातारा झाला आहे". 

कोण आहे अनुराग कश्यप (Who is Anurag Kashyap)

अनुराग कश्यप बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक आहे. दिग्दर्शक म्हणून त्याचे ब्लॅक फ्रायडे, नो स्मोकिंग, देव डी, गुलाल, दॅड गर्ल ईन यलो बुट्स आणि गँग्स ऑफ वासेपूर हे चित्रपट लोकप्रिय झाले आहेत. अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. 

संबंधित बातम्या

Anurag Kashyap : अनुराग कश्यपला विचित्र आणि विक्षिप्त लोक का आवडतात? कारण स्वत: दिग्दर्शकानेच सांगितले!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

नालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Embed widget