एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
FTII सोसायटीच्या सदस्यपदी अनुप जलोटा, हिरानी, कंगना
FTII सोसायटीच्या सदस्यपदी राजकुमार हिरानी, विधू विनोद चोप्रा, डॅनी डेंग्झोप्पा, अरविंद स्वामी, सतीश कौशिक, कंगना राणावत, दिव्या दत्ता, येशुदास यांची वर्णी लागली आहे.
![FTII सोसायटीच्या सदस्यपदी अनुप जलोटा, हिरानी, कंगना Anup Jalota, Rajkumar Hirani, Kangana Ranaut selected as members of FTII Society FTII सोसायटीच्या सदस्यपदी अनुप जलोटा, हिरानी, कंगना](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/26203555/Anup-Jalota.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' अर्थात 'एफटीआयआय'च्या सोसायटीच्या सदस्यांमध्ये भजनसम्राट अनुप जलोटा यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही निवड करण्यात आली आहे.
एफटीआयआय सोसायटीच्या सदस्यांमध्ये बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकारांची वर्णी लागली आहे. यामध्ये अनुप जलोटांसोबत दिग्दर्शक राजकुमार हिरानी, निर्माते विधू विनोद चोप्रा, अभिनेते डॅनी डेंग्झोप्पा, अरविंद स्वामी, सतीश कौशिक, अभिनेत्री कंगना राणावत, दिव्या दत्ता, संगीतकार येशुदास यांचा समावेश आहे.
अनुप जलोटा बिग बॉसमधील आतापर्यंतचे सर्वात महागडे स्पर्धक
अनुप जलोटा बिग बॉसच्या बाराव्या पर्वामध्ये सहभागी झाले आहेत. अनुप जलोटा वयाने 37 वर्ष लहान गर्लफ्रेंडमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. एफटीआयआय सोसायटीच्या इतर सदस्यांमध्ये ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचाही समावेश असून ते गेल्या वर्षभरापासून एफटीआयआयच्या संचालकपदी आहेत.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बॉलीवूड
वर्ल्डकप
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)