Antim Song : Salman Khan च्या अंतिम सिनेमातील Koi Toh Aayega गाणं प्रदर्शित, गाण्यात भाईजानचा दबंग अवतार
Antim New Song Koi Toh Aayega : सलमान खान आणि आयुष शर्माच्या अंतिम सिनेमातील 'कोई तो आएगा' हे गाणं प्रदर्शित झाले आहे.
Salman Khan Movie Antim New Song Koi Toh Aayega : सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्माच्या (Aayush Sharma) 'अंतिम-द फायनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) सिनेमातील 'कोई तो आएगा' (Koi Toh Aayega) हे नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. अंतिम सिनेमातील 'कोई तो आएगा' हे गाणे सलमान खानवर चित्रीत करण्यात आले आहे. याआधी सिनेमातील 'चिंगारी' गाणे प्रदर्शित करण्यात आले होते.
'कोई तो आएगा' या गाण्याचा व्हिडीओ सलमान खानने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या गाण्याच्या माध्यमातून सलमान पुन्हा एकदा दबंगच्या भूमिकेत दिसतो आहे. गाण्यात सलमान मोठ्या प्रमाणात अॅक्शन तडका आणि मारामारी करताना दिसतो आहे. तसेच गाण्यात सलमान खाकी वर्दीमध्ये भांगडा करताना दिसतो आहे.
'अंतिम-द फायनल ट्रुथ' सिनेमातील 'कोई तो आएगा' या गाण्यात आयुष शर्मा दिसत नाही. अंतिम सिनेमातील या नव्या गाण्याचे बोल रवि बसरूर आणि शब्बीर अहमदने लिहिले आहेत. सिनेमातील हे नवे गाणे अनेक गायकांनी मिळून गायले आहे.
सलमान खानचा 'अंतिम-द फायनल ट्रुथ' सिनेमा 26 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमात सलमान खानसोबत आयुष शर्मादेखील मुख्य भूमिकेत असणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अंतिम सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे चाहते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमात सलमान खान पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आयुष शर्मा एका गुंडाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान आणि आयुष शर्माची जोडी पहिल्यांदाच या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत 'भाई का बर्थडे', 'होने लगा' आणि 'चिंगारी' अशी तीन गाणी प्रदर्शित झाली होती.
संबंधित बातम्या