Aamir Khan movie Laal Singh Chaddha : आमीरच्या ‘लाल सिंह चड्ढा' ची रिलीज डेट ठरली; आमिर-करिनाच्या लूकनं वेधलं लक्ष
अभिनेता अमीर खान (Aamir Khan) आणि अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) यांचा बहुचर्चित चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा' ची त्यांचे चाहते उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
Aamir Khan and Kareena Kapoor movie Laal Singh Chaddha : अभिनेता अमीर खान (Aamir Khan) आणि अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) यांचा बहुचर्चित चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा' ची त्यांचे चाहते उत्सुकतेने वाट पाहात आहेत. काही दिवसांपूर्वी हा चित्रपट 2022 मध्ये व्हॅलेंटाईन डेला, प्रदर्शित होईल अशी चर्चा होती. पण आता आमीर खान प्रॉडक्शन हाऊसच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करून चित्रपटाची रिलीज डेट जाहिर करण्यात आली आहे.
‘लाल सिंह चड्ढा'चे पोस्टर
आमीर खान प्रॉडक्शन हाऊसच्या सोशल मीडिया अकाऊंटने शेअर केलेल्या लाल सिंह चड्ढाच्या पोस्टरमध्ये आमीर आणि करिना खास लूकमध्ये दिसत आहे. आमीर खान प्रॉडक्शन हाऊसने हा पोस्टर शेअर करून त्यांनी कॅप्शन दिले, 'आमच्या चित्रपटाचे नवे पोस्टर आणि रिलीज डेट शेअर करताना आम्हाला आनंद होत आहे.' लाल सिंह चड्ढा हा 14 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. या चित्रपटात करिना आणि आमीरसोबतच अभिनेता नागा चैतन्य आणि मोना सिंग देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण पंजाब, हिमाचल प्रदेश, लडाख आणि तुर्की येथे झाले आहे. लाल सिंह चड्ढा हा टॉम हँक्स आणि रॉबिन राइट यांच्या फॉरेस्ट गंप या हिट चित्रपटाचा रिमेक आहे. आमिर खान, किरण राव आणि वायकॉम 18 स्टूडियोज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
Navya Naveli Nanda: अमिताभ बच्चन यांची नात करतेय 'गली बॉय'ला डेट? सोशल मीडियावर रंगल्यात चर्चा