(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Animal Viral Deleted Scene: चेहऱ्यावर जखमा अन् हातात दारुचा ग्लास; रणबीरच्या 'अॅनिमल' मधून हटवण्यात आलेल्या 'त्या' सीनची चर्चा
Animal Viral Deleted Scene: नुकताच चित्रपटातील एक हटवलेला सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सीनमध्ये रणबीरचा डॅशिंग लूक पाहायला मिळत आहे. जो जखमी अवस्थेत विमान उडवताना दिसत आहे.
Animal Viral Deleted Scene: अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि बॉबी देओलचा (Booby Deol) नुकताच रिलीज झालेला 'अॅनिमल' (Animal) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटामधील सीन्सची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. नुकताच चित्रपटातील एक हटवलेला सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सीनमध्ये रणबीरचा डॅशिंग लूक पाहायला मिळत आहे. जो जखमी अवस्थेत विमान उडवताना दिसत आहे.
'अॅनिमल' मधून डिलीट करण्यात आलेला सीन व्हायरल
रणबीर आणि रश्मिका यांचा अॅनिमल हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या या चित्रपटावर प्रेक्षक कौतुकाचा वर्षाव करत आहेत. या चित्रपटातील काही भाग आणि दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या अॅक्शन सीन्सचं अनेकजण कौतुक करत आहेत. अॅनिमल चित्रपटातून डिलीट करण्यात आलेला एक सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सीनमध्ये रणबीर हा दारुच्या नशेत विमान उडवताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ:
Deleted Scene from #Animal#AnimalTheMovie #AnimalMovie#AnimalPark #AnimalMovieReview#RashmikaMandana #RanbirKapoorpic.twitter.com/GbKfS1wnlH
— DUNKI (@DUNKISRKIAN) December 2, 2023
अॅनिमल चित्रपटामधून हटवण्यात आलेल्या सीनमध्ये रणबीर कपूर जखमी अवस्थेत विमानात दारु पिताना दिसत आहे. सीनमझ्ये दिसते की, रणबीर अचानक पायलटला त्याच्या सीटवरून उभा राहायला सांगतो आणि स्वतः विमान उडवायला सुरुवात करतो.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
अॅनिमल चित्रपटामधून हटवण्यात आलेल्या सीनला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "हा सीन चित्रपटामधून का डिलीट केला?" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "आम्ही या चित्रपटाच्या ओटीटी व्हर्जनची वाट बघत आहोत."
रणबीरचा 'अॅनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटानं भारतीय बॉक्स ऑफिसवर 63.8 कोटींची कमाई केली. रिलीजच्या तीन दिवसांतच या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 200 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
'अॅनिमल' मधील गाण्यांना मिळाली प्रेक्षकांची पसंती
'अॅनिमल' या चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या चित्रपटामधील अर्जन व्हेली आणि सतरंगा या दोन्हीही गाण्यांचे अनेक जण कौतुक करत आहेत.
कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार अॅनिमल?
अॅनिमल हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची अनेकजण वाट बघत आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल, असा अंदाज लावला जात आहे. पण नेटफ्लिक्स याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
संबंधित बातम्या