एक्स्प्लोर
अनिकेत विश्वासराव, प्रार्थना बेहेरेचा लोणावळ्याजवळ अपघात
अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या गाडीला लोणावळ्याजवळ अपघात झाला आहे.
पुणे: अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या गाडीला लोणावळ्याजवळ अपघात झाला आहे.
सिनेमाच्या प्रमोशनसाठी कोल्हापूरकडे जात असताना, त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात प्रार्थना बेहेरे जखमी झाली आहे. प्रार्थनाच्या हाताला दुखापत झाली आहे.
अनिकेत आणि प्रार्थना हे दोघे आगामी मस्का या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कोल्हापूरकडे निघाले होते. त्यावेळी आज सकाळी 8 च्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला.
दरम्यान, जखमी प्रार्थना बेहेरेला लोणावळा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
या गाडीत अनिकेत, प्रार्थनासह ड्रायव्हर आणि प्रार्थनाची सहाय्यक होती. लोणावळ्याजवळ घाटात एक टेम्पो बंद पडला होता. त्या टेम्पोचा अंदाज न आल्याने, तो चुकवण्याच्या नादात अनिकेत-प्रार्थनाच्या गाडीला अपघात झाला.
"मी पुढच्या सीटवर होतो. मी बेल्ट लावून बसलो होतो, त्यामुळे मला दुखापत झाली नाही. अपघात भीषण होता. बाजूलाच दरी होती, सुदैवाने आम्ही वाचलो. प्रार्थनाच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे." असं अनिकेत विश्वासरावने एबीपी माझाला सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement