Ananya Panday : अनन्या पांडेने शेअर केला जुना फोटो, चाहते म्हणाले...
अभिनेत्री अनन्या पांडेने (Ananya Panday) आपले काही जुने फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यावर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.
Ananya Panday : अभिनेता चंकी पांडेची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सोशल मीडियावरही अनन्या सक्रिय असते. आताही अनन्या चर्चेत आहे. परंतु, यावेळी कारण वेगळंच आहे. अनन्याने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती तलावाच्या शेजारी बसलेली दिसत आहे. या फोटोवरून चाहते तिला अनेक प्रश्न विचारत आहेत. काहीजण म्हणत आहेत की, अनन्याला कोणाची आठवण येत आहे का? तर काही जण अनन्या कोठे फिरायला गेली आहे? याबाबत विचारत आहेत.
प्रत्येक बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच अनन्या पांडेलाही प्रवासाची आवड आहे. परंतु, सध्या ती कोठेही फिरायला गेली नाही. परंतु, या पूर्वी अनन्या उदयपूरला फिरायला गेली होती. तोच फोटो तिने परत शेअर केला आहे. पर्वत आणि तलावांनी वेढलेले उदयपूर हे शहर खरोखरच खूपच सुंदर आहे. अनन्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने उदयपूरची खास झलक दाखवली आहे. या पूर्वी फिरायला गेलेला फोटो शेअर करून अनन्याने या सुंदर व्हेकेशनची आठवण करून दिली आहे.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर उदरपूरचे फोटे शेअर करताना तिने त्याखाली कॅप्शनही दिले आहे. "उदयपूरच्या सुंदर आणि जादुई काळाची आठवत येत आहे" असे कॅप्शन अनन्याने या फोटोला दिले आहे.
दरम्यान, सध्या अनन्या ईशान खट्टरला डेट करत असल्याची चर्चा आहे. परंतु, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अद्याप मौन बाळगले आहे. अलीकडेच अनन्याने ईशानचा भाऊ शाहिदच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती.
महत्वाच्या बातम्या
- Ananya Panday : रिलेशनशिपवर अनन्या पांडेने सोडलं मौन, ईशान खट्टरबद्दल बोलताना म्हणाली...
- Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' ओटीटीवर पाहण्यासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागू शकते, 'हे' आहे कारण
- Pawankhind : दुसऱ्या आठवड्यातही 'पावनखिंड'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! पाहा कलाकार काय म्हणतात...
- Ponniyin Selvan-1 : ऐश्वर्याच्या 'पोन्नियन सेलवन' ची रिलीज डेट जाहीर ; फर्स्ट लूक चर्चेत