VIDEO : लेकाच्या वरातीत आई नीता अंबानीचे ठुमके, वयाच्या 60 व्या वर्षी तरुणाईला लाजवेलं असं सौंदर्य
Anant Ambani Radhika Wedding : अंबानींच्या मुंबईतील निवासस्थान अँटिलिया येथून निघून जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचली आहे. लाडक्या लेकाच्या लग्नात आई नीता अंबानीने डान्स केला असून त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लाडका धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज 12 जुलैला विवाहबंधनात अडकणार आहेत. अनंत अंबानीची वरात जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचली आहे. अंबानींच्या मुंबईतील निवासस्थान अँटिलिया येथून निघून जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचली आहे. लाडक्या लेकाच्या लग्नात आई नीता अंबानीने डान्स केला असून त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
लेकाच्या वरातीत आई नीता अंबानीचे ठुमके
अंबानींच्या मुंबईतील अँटिलिया या घरातून अनंत अंबानीची वाजत-गाजत धूमधडाक्यात वरात निघाली. ढोल ताशाच्या गजरात अनंत अंबानीची वरात निघाली. यावेळी आई नीता अंबानीने ढोल-ताशाच्या तालावर ठेका धरला. उपस्थितांनीही यावेळी वरातील मनमुराद नाचण्याचा आनंद घेतला. याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. नीता अंबानी यामध्ये फारच सुंदर अशा ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहेत. वयाच्या साठीत असणाऱ्या नीता अंबानींचं सौंदर्य तरुणीलाही लाजवेल असं आहे.
ढोल-ताशाच्या तालावर नीता अंबानींचा डान्स
Nita Ambani Dance #NitaAmbani #AmbaniWedding #AnantRadhikaWedding #Trending #RadhikaMerchant #AnantAmbani pic.twitter.com/Q0iQM8FpZy
— Nishant Vohra (@nishantvohra_25) July 12, 2024
वरात जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचताच सर्वप्रथम पगडी बांधण्याचा सोहळा पार पडला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आता थोड्याच वेळात विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्नात परदेशी पाहुणे दाखल होत असून, त्यांचे खास स्वागत करण्यात येत आहे. विमानतळापासून हॉटेलपर्यंत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. देशी-विदेशी स्टार्सनी ही पार्टी सजली आहे.
बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी
लग्नाच्या पाहुण्यांनी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये जोरदार डान्स केला. रेसलर जॉन सीना, रणवीर सिंह, संजय दत्त, जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूर यांनी भरपूर डान्स केला. आई नीता अंबानी यांनीही मुलाच्या लग्नात डान्स केला. काही वेळात वरमाला समारंभ होईल. रात्री 9.30 वाजता लगन, सात फेरे आणि सिंदूर दानाचा विधी सुरू होईल.
वयाच्या 60 व्या वर्षी तरुणाईला लाजवेलं असं सौंदर्य
मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांचं वय 60 वर्ष आहे. पण त्या कमालीच्या फिट आहेत. वयाच्या साठीतही नीता अंबानी यांचं सौंदर्य तरुणाईला लाजवेल असं आहे. त्या तेवढ्याच स्टायलिशही आहेत. अनंत अंबानीच्या लग्नाच्या प्रत्येक विधीमध्ये त्यांचा सुंदर ट्रेडिशनल अंदाज पाहायला मिळाला.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :