VIDEO : अनंत अंबानीच्या वरातीत 'देसी गर्ल' प्रियंकाचे ठुमके, सेलिब्रिटींसह नवरदेवाची ग्रँड एन्ट्री
Anant Ambani Barat Dance : अनंत अंबानीची वरात बीकेसीमध्ये पोहोचली आहे. यावेळी बॉलिवूडच्या कलाकार मंडळी अनंत अंबानीच्या लग्नात कल्ला करताना दिसत आहे.
![VIDEO : अनंत अंबानीच्या वरातीत 'देसी गर्ल' प्रियंकाचे ठुमके, सेलिब्रिटींसह नवरदेवाची ग्रँड एन्ट्री Anant Ambani Radhika wedding Barat Priyanka Chopra nick Jonas anil kapoor and bollyood Celedruties BKC jio world Centre marathi news VIDEO : अनंत अंबानीच्या वरातीत 'देसी गर्ल' प्रियंकाचे ठुमके, सेलिब्रिटींसह नवरदेवाची ग्रँड एन्ट्री](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/12/8290f71ecd2135d3d86dba18cc17169c1720794159948322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant Radhika wedding) यांच्या लग्नसोहळ्याला सुरुवात झाली आहे. अनंत अंबानीची वरात अँटिलिया येथून निघून लग्नस्थळी बीकेसीमध्ये पोहोचली आहे. या लग्नसोहळ्याचा दिग्गजांसह सिनेतारकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. 12 जुलै रोजी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये लग्नसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. तर पुढील दोन दिवस रिसेप्शन असणार आहे.
सेलिब्रिटींसह नवरदेवाची ग्रँड एन्ट्री
अनंत अंबानीची वरात बीकेसीमध्ये पोहोचली आहे. यावेळी बॉलिवूडच्या कलाकार मंडळी अनंत अंबानीच्या लग्नात कल्ला करताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींनी अनंतच्या वरातीत नाचण्याची कोणतीही कसर सोडलेली नाही. अनंत अंबानीने एटीव्हीमधून जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये एन्ट्री मारली. यावेळी सर्व सिने कलाकारांनी त्याला घेरून नाचायला सुरुवात केली.
अनंतच्या वरातील 'देसी गर्ल' प्रियंकाचे ठुमके पाहा व्हिडीओ
View this post on Instagram
अनंत आणि राधिकाचा शाही विवाहसोहळा
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. जामगनरपासून सुरू झालेल्या या जोडप्याच्या लग्नाआधीच्या फंक्शन्सची अनेक महिन्यांपासून चर्चा होती. आता अखेर आज हे दोघेही लग्न बंधणात अडकणार आहेत. अनंत-राधिकाचा शाही विवाह मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडत आहे.
View this post on Instagram
शाही विवाहाला उरले काही तास
या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेले लग्नाला अवघे काही तास उरले आहेत. मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं 12 जुलै रोजी लग्न होणार आहे. त्याआधी नवरदेव अनंत अंबानी ढोल-ताशांसह धूमधडाक्यात वरात घेऊन Jio वर्ल्ड सेंटरवर पोहोचला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Anant-Radhika Wedding : अनंत, आकाश की ईशा, अंबानी कुटुंबातील कुणाच्या लग्नात सर्वाधिक खर्च?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)