Anant-Radhika Wedding: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये ओरीचा खाद्यपदार्थांवर आडवा हात, पण वडा पावमध्ये आढळला केस
Anant-Radhika Wedding : अनंत आणि राधिकाच्या लग्नानिमित्ताने दोन वेळेस प्री-वेडिंग सोहळे पार पडले होते. दुसरा प्री-वेडिंग सोहळा हा 29 मे ते 2 जून दरम्यान क्रूजवर पार पडला होता.
Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) हे 12 जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. याआधी अनंत आणि राधिकाच्या लग्नानिमित्ताने दोन वेळेस प्री-वेडिंग सोहळे पार पडले होते. पहिला प्री-वेडिंग फंक्शन हा गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडला होता. त्यानंतर दुसरा प्री-वेडिंग सोहळा हा 29 मे ते 2 जून दरम्यान क्रूजवर पार पडला. या ग्रँड प्री-वेडिंगमध्येही बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. त्याशिवाय, काही सोशल मीडिया सेंसेशन ओरी हा देखील सहभागी झाला होता.
नुकतंच ओरीने इटलीतील पोर्टोफिनोमध्ये झालेल्या फंक्शनचा एक व्लॉग शेअर केला. यामध्ये ओरी फूड स्टॉलची टूर करताना दिसत आहे. त्याच वेळी त्याला वडापाव मध्ये केस आढळतो.
वडापावमध्ये आढळला केस...
व्लॉगमध्ये ओरी वेगवेगळ्या स्टॉल्सला भेट देऊन खाद्यपदार्थांचा आढावा घेताना दिसत आहे. यादरम्यान ओरी हा वडा पाव फूड स्टॉलवरही पोहोचतो. यावेळी त्याच्यासोबत त्याची बेस्ट फ्रेंड तानिया श्रॉफही होती. ओरी आणि तानिया प्लेटमध्ये वडा पाव घेतात आणि मग तानिया ओरीला सांगते की, मला वडा पाव खाण्याची आणखी इच्छा आहे पण त्यात केस आढळला आहे.
मी आणखी एक....
त्यानंतर, ओरी आपल्या कॅमेराचा फोकस प्लेटवर आणतो आणि वडा पावमध्ये आढळलेला केस दाखवण्यासाठी झूम इन करतो. यानंतर दोघेही वडापाववर ताव मारतात. यावेळी तानिया म्हणते की मला आणखी एक बाईट घ्यायचा होता. पण, त्यात केस आढळला.
अनंत-राधिकाच्या हळदी समारंभात सेलिब्रिटींचा मांदियाळी...
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा हळदी आणि मेहंदी सोहळा 8 जुलै रोजी झाला होता. यावेळी सलमान खान, रणवीर सिंग, जान्हवी कपूरपासून ते सारा अली खान आणि ओरी देखील उपस्थित होते. सगळे सेलेब्स हळदीत रंगलेले दिसले.
अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) पार पडलेल्या संगीत सोहळ्यातही अनेकांचा विशेष अंदाज पाहायला मिळाला. पण या सगळ्यात उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांच्या नृत्याने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं.
अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात बॉलीवूडकरांसह तेजस ठाकरेही थिरकताना दिसले. सोशल मीडियावर सध्या तेजस ठाकरेंचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. काजोल आणि शाहरुखच्या गाण्यावर तेजस ठाकरेंनीही ताल धरला. पण तेजस ठाकरेंच्या या नृत्यावर सत्ताधाऱ्यांनी मात्र चांगलाच निशाणा साधला. त्यामुळे राजकीय वर्तुळातही तेजस ठाकरे यांचा डान्स हा चर्चेचा विषय ठरत आहे.