Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding : मुलगा, लेक, जावई अन् सून; अनंत-राधिकाच्या प्री वेंडिगमध्ये कपूरांचा 'फॅमिली फोटो'
Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding : अनंत राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी नीतू सिंग सैफअली खान, करिना कपूर खान , रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी देखील उपस्थिती दर्शवली.
Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding : जामनगरमध्ये सुरु असलेल्या अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या प्री वेडिंग कार्यक्रमाला जवळपास सगळ्याच बॉलीवूडकरांनी हजेरी लावली. दरम्यान या सोहळ्याची शेवटची संध्याकाळही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीने उजळून निघाली. या सोहळ्याला नीतू सिंग (Nitu Singh), सैफअली खान (Saif Ali Khan), करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan), रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Aalia Bhatt) यांनी देखील उपस्थिती दर्शवली. नुकतच आलियाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्यांचा फॅमिली फोटो शेअर केलाय.
ट्रेडिशनल आऊटफिटमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी करीना कपूर खान, सैफ अली खान आणि नीतू कपूर यांच्यासोबत एक फॅमिली फोटो काढला. सध्या या फॅमिली फोटोची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. तसेच या फॅमिली फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. या फोटोमध्ये रणबीर कपूर निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये, आलिया भट्ट गोल्डन कलरच्या लेहंग्यामध्ये दिसत आहे. तर नीतू सिंग पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तर करिना आणि सैफ देखील यांच्या देखील आऊटफिटची सध्या चर्चा आहे.
View this post on Instagram
अनंत राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये बॉलीवूडकर थिरकले
अनंत अंबानीआणि राधिका मर्चेंट यांचं शाही प्री-वेडिंग सध्या पार पडत आहे. या प्री-वेडिंगने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये बॉलिवूडकरांनी डान्स केला आहे. शाहरुख (Shah Rukh Khan), सलमान (Salman Khan) आणि आमिर (Aamir Khan) या तिन्ही खानचा एकत्र डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंगच्या कार्यक्रमांना बॉलीवूडकरांची मंदियाळी
मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. 1 मार्च ते 3 मार्चदरम्यान त्यांचे प्री वेडिंगचे फंक्शन पार पडले. या कार्यक्रमात जगभरातील सेलिब्रिटी सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. बॉलिवूडपासून साऊथच्या सिने तारका जामनगरला पोहचले. तसेच सलमान खान, अभिषेक बच्चन, जान्हवी कपूर, अर्जुन कपूर यांसारखे अनेक कलाकार या कार्यक्रमांना उपस्थिती लावली. रणबीर कपूर आणि आलियासह लेक राहा देखील या कार्यक्रमांसाठी पोहचली होती.