Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding : अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगमध्ये बॉलिवूडकर थिरकले; तिन्ही खानचा एकत्र डान्स पाहिलात का?
Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding : अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगमध्ये बॉलिवूडकरांनी डान्स केला आहे. शाहरुख (Shah Rukh Khan), सलमान (Salman Khan) आणि आमिर (Aamir Khan) या तिन्ही खानचा एकत्र डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding : अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांचं शाही प्री-वेडिंग सध्या पार पडत आहे. या प्री-वेडिंगने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये बॉलिवूडकरांनी डान्स केला आहे. शाहरुख (Shah Rukh Khan), सलमान (Salman Khan) आणि आमिर (Aamir Khan) या तिन्ही खानचा एकत्र डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्री-वेडिंगच्या दुसऱ्या दिवशी संगीत आणि गरबा नाईटचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बॉलिवूडचा जलवा पाहायला मिळाला. तीन खानच्या एकत्र डान्ससह करीना-दीपिकानेदेखील आपलं सादरीकरण केलं.
तिन्ही खानचा एकत्र डान्स
शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये एकत्र डान्स केला. 'आरआरआर' (RRR) या सिनेमातील ऑस्कर विजेत्या 'नाटू नाटू' गाण्यावर त्यांनी डान्स केला. सुरुवातीला त्यांनी गाण्यातील ओरिजनल स्टेप्स कॉपी केल्या आणि नंतर तिन्ही खानच्या एकत्र डान्स सादरीकरणाने, आपल्या स्टाईलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सध्या सोशल मीडियावर त्यांचे हे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
दिलजीत दोसांझचा किलर परफॉर्मेंस
दिलजीत दोसांझने आपल्या चार्टबस्टर गाण्यांवर संगीत नाईटमध्ये जबरदस्त परफॉर्मेंस सादर केला. दिलजीतला पुढे शाहरुख खान, सुहाना खान, अनन्या पांडे, शनाया कपूर आणि नव्या नंदा यांनी ज्वॉइन केलं. करीना कपूरने सैफ अली खानसोबत डान्स केला. बॉलिवूडचे आघाडीचे कलाकार अनन्या पांडे, जान्हवी कपूर, खुशी कपूर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान यांनीदेखील डान्स केला. लेजा-लेजा गाण्यावर डान्स करताना ते दिसून आले.
View this post on Instagram
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला दिग्गजांची मांदियाळी
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला देशासह परदेशातील मंडळीदेखील उपस्थित आहेत. यात अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, विकी कौशल, कतरिना कैफ, आलिया भट्ट, रणबीर कपूर, करण जौहर, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर या सेलिब्रिटींचा समावेश आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील पॉप सिंगर रिहानाचा या प्री-वेडिंगला खास परफॉर्मेंस पार पडला आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग, मॉर्गल स्टेनलीचे सीईओ टेड पिक, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, डिज्नीचे संस्थापक बॉब इगरसह अनेक मंडळींनी हजेरी लावली आहे.
संबंधित बातम्या