Anant Ambani Radhika Merchant : अनंत अंबानीने राधिका मर्चंटसोबत दुबईत केलं बर्थडे सेलिब्रेशन; Atif Aslam च्या परफॉर्मन्सने वेधलं लक्ष
Anant Ambani : अनंत अंबानीने राधिका मर्चंटसोबत दुबईत वाढदिवस साजरा केला आहे.
Anant Ambani Birthday Bash With Radhika Merchant : देशातील सर्वात मोठे उद्योगपती म्हणून अंबानी (Ambani) यांची ओळख आहे. नुकताच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा (NMACC) शाही उद्धाटन सोहळा पार पडला. आता अनंत अंबानीने (Anant Ambani) राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) दुबईत (Dubai) बर्थडे सेलिब्रेशन केलं आहे.
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा लेक अर्थात अनंत अंबानी 28 वर्षांचा झाला आहे. 10 एप्रिल 2023 रोजी दुबईत त्याच्या बर्थडे सेलिब्रेशनचं आयोजन करण्यात आलं होतं. अनंत अंबानीने राधिका मर्चंटसोबत दुबईत त्याचा वाढदिवस साजरा केला आहे.
अनंत अंबानीच्या वाढदिवसाचं दुबईत जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. या वाढदिवसानिमित्त लोकप्रिय गायक आतिफ असलमचा (Atif Aslam) खास परफॉर्मन्स ठेवण्यात आला होता. आता अनंत अंबानीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनंत अंबानी दरवर्षी आपला वाढदिवस कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत साजरा करत असतो. यंदादेखील त्याने दुबईत जवळचे कुटुंबीय आणि खास मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत आपला वाढदिवस साजरा केला आहे.
अनंत अंबानीच्या बर्थडे सेलिब्रेशनला राधिका मर्चंट
अंबानी फॅन पेजवरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अनंत अंबानीची होणारी पत्नी अर्थात राधिका मर्चंट तिच्या मित्र-मंडळींसोबत दिसत आहे. पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये ती खूपच आनंदी दिसत आहे. राधिका तिच्या मित्र-मंडळींसोबत दुबईत अनंत अंबानीचा वाढदिवस साजरा करत आहे, असं म्हणत त्यांनी हा फोटो शेअर केला आहे.
'Atif Aslam'च्या परफॉर्मन्सने वेधलं लक्ष
अनंत अंबानीच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये आतिफ असलमचा (Atif Aslam) परफॉर्मन्स ठेवण्यात आला होता. त्याच्या या खास परफॉर्मन्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच गायक राहत फतेह अली खाननेदेखील 'बॉडीगार्ड' या सिनेमातील 'तेरी मेरी' हे गाणं गात अनंत अंबानीचा वाढदिवस खास केला. तसेच अनेक लोकप्रिय गायक आणि रॅपर यांनीदेखील आपल्या गाण्याने वाढदिवसाची शोभा वाढवली आहे.
अनंत अंबानी यांनी त्यांचा 27 वा वाढदिवस रिलायन्स टाउनशिपच्या रिफायनरीमध्ये साजरा केला होता. त्यावेळी बॉलिवूडचा लोकप्रिय गायक शान सह विनोदवीर सुगंधा मिश्रा यांच्या परफॉर्मन्सचे आयोजन करण्यात आले होते. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यानंतर चाहते आता त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा करत आहेत. अंबनींच्या अनेक कार्यक्रमात राधिकाला स्पॉट करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या