PHOTO : अनंत अंबांनी आणि तैमूरमध्ये एक खास कनेक्शन, तुम्हाला माहितीय? समोर आलाय फोटो...
Anant Ambani :
Anant Ambani : रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष, सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याचा नुकताच शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यातील अनेक फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर येत आहेत. यात अनंत अंबानी हे काही फारसे परिचीत नसणाऱ्या लोकांसमोर ही विनम्रपणे आणि आदराने संवाद साधताना दिसत आहे. अनंत अंबानीच्या एका फोटोमुळे तैमूरसोबतचे कनेक्शन समोर आले आहे.
मुकेश अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानीची त्याच्या बालपणी ज्या नॅनीने काळजी घेतली. त्याच नॅनीने करीना कपूर-सैफ अली खानचा मुलगा तैमूरची काळजी घेतली आहे. ज्यांना सावित्री म्हणून ओळखल्या जायच्या त्यांचे खरे नाव ललिता डिसिल्वा आहे.
ललिता डिसिल्वा यांनी 29 वर्षांच्या अनंत अंबानीच्या लग्नाशी संबंधित एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने अनंतचे बालपण कसे होते हे सांगितले आहे. नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचेही कौतुक केले.
ललिता डिसिल्वाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तिने अनंत अंबानींचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. यात तोही सोबत आहे. अनंत आणि ललिता डिसिल्वाचे हे चित्र डिस्ने वर्ल्ड पॅरिसच्या सहलीचे आहे. ललिताने हा फोटो शेअर करत म्हटले की, अनंत अंबानी लहानपणी खूप चांगले होते.
लहानपणी कसा होता अनंत?
ललिता डिसिल्वा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, 'डिस्ने वर्ल्ड पॅरिसमध्ये मी आणि अनंत आहे. येथूनच मी माझी बेबीसिटिंगची नोकरी सुरू केली. अनंत लहानपणी खूप गोड होता. आजही कुटुंबापासून ते सोशल ग्रुपमध्ये सगळेजण त्याच्यावर प्रेम करतात. आज त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे. मी या जोडप्याला त्यांच्या लग्नासाठी शुभेच्छा देते.
View this post on Instagram
ललिता यांनी अनंत-राधिकाला दिल्या शुभेच्छा...
ललिता डिसिल्वानेही अनंत आणि राधिकाच्या रिसेप्शनचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात अनंत व्यतिरिक्त ललिता या नीता आणि मुकेश अंबानीसोबत दिसत आहे. त्यांनी लिहिले की, 'अनंत बाबा आणि अंबानी कुटुंबाने माझ्या आयुष्यात जो आनंद आणि प्रेम दिले, त्याबद्दल मी खूप आभारी आहे. आम्ही एकत्र घालवलेल्या काळातील आनंदी आठवणी मला अजूनही जपल्या आहेत. त्यांच्या अतूट प्रेम आणि आदराबद्दल मी कृतज्ञ आहे. इतक्या वर्षांनंतरही त्यांची नम्रता, दयाळूपणा आणि औदार्य मला प्रेरणा देत आहे. माझ्या आयुष्यात नीता भाभी आणि मुकेश सर आहेत, यासाठी खूप धन्य झाली आहे. हे मला अजूनही त्यांच्या कुटुंबाचा एक भाग मानतात.
View this post on Instagram
ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट
ललिता डिसिल्वा यांनी पुढे लिहिले की, अनंत आणि राधिकासाठी खूप प्रेम आणि चांगल्या आयुष्यासाठी प्रार्थना करते. त्यांना आरोग्यदायी आयुष्य लाभो. अंबानी कुटुंबाचे प्रेम आणि पाठिंबा मिळणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यांच्या आयुष्यातील एक भाग असणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.
राम चरणच्या मुलीचा सांभाळ
ललिता डिसिल्वा या सध्या अभिनेता राम चरणची मुलगी क्लिन कारा कोनिडेलाचा नॅनी म्हणून सांभाळ करत आहे. ललिता या राम चरण आणि उपासना यांच्यासोबतचा फोटो शेअर करत असतात.