Actress : पहिल्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये, बिना लग्नाची राहिली गरोदर अन् झाला ब्रेकअप; आता दुसऱ्याच प्रियकरासोबत स्वित्झर्लंडमध्ये अभिनेत्रीने उरकला साखरपुडा
Amy Jackson - ED Westwick Engagement : 'सिंह इज ब्लिंग' (Singh Is Bliing) फेम अभिनेत्री एमी जॅक्सनचा (Amy Jackson) बॉयफ्रेंडसोबत स्वित्झर्लंडमध्ये साखरपुडा झाला आहे.
Amy Jackson - ED Westwick Engagement : 'एक दीवाना था' आणि सिंह इज ब्लिंग' (Singh Is Bliing) सारख्या बॉलिवूड सिनेमांच्या माध्यमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री एमी जॅक्सन (Amy Jackson) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. एमीने बॉयफ्रेंड एड वेस्टविकसोबत (ED Westwick) साखरपुडा केला आहे. अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एमीला तिच्या बॉयफ्रेंडने स्वित्झर्लंडमध्ये प्रपोज केलं आहे.
एमी जॅक्सनने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बॉयफ्रेंड एड तिला प्रपोज करताना दिसत आहे. स्वित्झर्लंडमधल्या डोंगररांगामध्ये त्याने तिला प्रपोज केलं आहे. अभिनेत्रीने हे फोटो शेअर करत खास कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहिलं आहे,"Hell Yes". एमी आणि एडचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
पहिल्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये, बिना लग्नाची राहिली गरोदर
एमी जॅक्सन एडआधी जॉर्ज पानायियोटोसोबत रिलेशनमध्ये होती. जॉर्जने एमीला जानेवारी 2019 मध्ये प्रपोज केलं होतं. एमीने जॉर्जला होकार दिला होता. त्यानंतर ते लिव्ह इनमध्ये राहायला लागले. दरम्यान लग्न न करताच ती गरोदर राहिली. सप्टेंबर 2019 मध्ये तिने एका मुलाला जन्म दिला. पण नंतर त्यांचा ब्रेकअप झाला.
एमीच्या आयुष्यात एड वेस्टविकची एन्ट्री
जॉर्जसोबत ब्रेकअप झाल्यानंतर एमीच्या आयुष्यात एड वेस्टविकची एन्ट्री झाली. एमी आणि एड यांनी 2022 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. आता त्यांचा साखरपुडा झाला असून लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. एड वेस्टविकने अनेक इंग्रजी सिनेमांत काम केलं आहे. यात गॉसिप गर्ल, व्हाइट गोल्ड आणि रोमियो और जूलियटसारख्या सिनेमांचा समावेश आहे.
एमी जॅक्सनच्या कामाबद्दल जाणून घ्या...
एमी जॅक्सन 'क्रैक' या आगामी सिनेमाच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विद्युत जामवाल, नोरा फतेही आणि अर्जुन रामपाल सारख्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. एमीने प्रतीक बब्बरच्या 'एक दीवाना था' या सिनेमाच्या माध्यमातून 2012 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हिंदीसह तिने अनेक दाक्षिणात्य सिनेमांत आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. यात येवाडू, थेरी, आई आणि रोबोट 2.0 या सिनेमांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या