Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांचे नवं गाणं 'वो तेरे प्यार का गम' प्रेक्षकांच्या भेटीला; अल्पावधित 2 मिलियन व्ह्यूज
Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांचे नवं गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Amruta Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात. कधी ट्वीट केल्यामुळे तर कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात. नुकतेच अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'वो तेरे प्यार का गम' (Woh Tere Pyar Ka Gham) असे या गाण्याचे नाव आहे.
अल्पावधित 2 मिलियन व्ह्यूज
अमृता फडणवीस यांचे 'वो तेरे प्यार का गम' हे नवं गाणं सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. अल्पावधीतच या गाण्याला 2 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. 'माय लव्ह' या हिंदी सिनेमातील 'वो तेरे प्यार का गम' हे गाणं आहे. आता या गाण्याचे रिक्रिएट वर्जन अमृता फडणवीस यांनी गायले आहे.
View this post on Instagram
'सारेगम' या युट्यूब चॅनलवर 'वो तेरे प्यार का गम' हे गाणं लॉंच करण्यात आलं आहे. या गाण्याचा व्हिडीओमध्ये अमृता फडणवीस स्वत: हे गाणं गाताना दिसत आहेत. अमृता फडणवीस यांच्या गाण्याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता असते. 'वो तेरे प्यार का गम' हे गाणं त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
'जब दिल टूटता है तो आवाज होती है' असं म्हणत अमृता फडणवीसने हे गाणं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. 'माय लव्ह' सिनेमातील 'जब दिल टूटता है तो आवाज होती है' हे गाणं आनंद बक्षी यांनी गायलं होतं. तर मुकेश यांनी गायलं होतं. पण आता या गाण्याचं रिक्रिएट वर्जन अमृता फडणवीस यांनी गायलं आहे.
संबंधित बातम्या