(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amruta Fadnavis : "मूड बना लिया" म्हणत अमृता फडणवीस थिरकल्या; चाहत्यांना केलं आवाहन
Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर 'आज मैंने मूड बना लिया है' या गाण्यावर हुकअप स्टेप करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Amruta Fadnavis On Aaj Main Mood Bana Liya Ay Song : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सध्या 'आज मैंने मूड बना लिया है' (Aaj Main Mood Bana Liya Ay) या गाण्यामुळे चर्चेत आहे. अशातच आता त्यांनी सोशल मीडियावर या गाण्यावर हुकअप स्टेप करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
अमृता फडणवीस यांनी 'आज मैंने मूड बना लिया है' (Aaj Main Mood Bana Liya Ay) या गाण्यावर हुकअप स्टेप (Hookstep) करतानाचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना एक आवाहन केलं आहे. त्यांनी चाहत्यांना या गाण्यावर रिल (Reel) बनवण्याचं आवाहन केलं आहे. तसेच रिल बनवल्यानंतर गाण्याचे हॅशटॅग वापरुन व्हिडीओ अपलोड करण्यास सांगितलं आहे.
अमृता फडणवीस यांच्या व्हिडीओवर चाहत्यांच्या लक्षवेधी कमेंट्स (Amruta Fadnavis Dance Video)
अमृता फडणवीस यांच्या व्हिडीओवर आपल्या जे आवडतं ते करत राहावं... जगाचा विचार करू नये हे आम्ही तुमच्याकडून शिकलो आहे, डान्स रिल वगैरे करण्यासारखा प्रकार देवेंद्र फडमवीस यांच्या पत्नीकडून अपेक्षित नाही, अमृता जोमात देवेंद्र कोमात, संगीतक्षेत्रात प्रगती केल्यानंतर आता मामी डान्सकडे वळाल्या, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
View this post on Instagram
अमृता फडणवीस यांचा हटके अंदाज एकीकडे चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. तर दुसरीकडे त्यांना ट्रोल केलं जात आहे. गाण्याची आवड असलेल्या अमृता फडणवीस या बॅंकर आहेत. त्यांची अनेक गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. सोशल मीडियावर त्यांची गाणी प्रचंड व्हायरल होतात.
अमृता फडणवीस यांची गाणी (Amruta Fadnavis Songs)
अमृता फडणवीस यांची मोरया रे, वो तेरे प्यार का गम, तिला जगू द्या, शिव तांडव स्त्रोत्म ही गाणी आजवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. आता चाहत्यांना त्यांच्या नव्या गाण्याची उत्सुकता लागली आहे. अमृता त्यांच्या ग्लॅमरस लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतात.