एक्स्प्लोर
डॉ. अमोल कोल्हेंच्या मुलीचं टीव्हीवर दमदार पदार्पण
छत्रपती संभाजी महाराजांचा महापराक्रमी इतिहास सर्वांसमोर मांडणाऱ्या 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे यांची मुलगी एक महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांचा महापराक्रमी इतिहास सर्वांसमोर मांडणाऱ्या 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेत एका नव्या बालकलाकाराची एंट्री झाली आहे. संभाजी राजांची भूमिका अजरामर करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांची मुलगी या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारत आहे. आद्या कोल्हे असे तिचे नाव आहे. मालिकेमध्ये आद्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची मुलगी तारा हिची भूमिका निभावत आहे.
अमोल कोल्हे 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेद्वारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजे यांचा इतिहास प्रामाणिकपणे आपल्यासमोर मांडत आहेत. या प्रयत्नांना त्यांची मुलगी आद्या ही देखील हातभार लावत आहे.
मालिकेच्या सोमवारी प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये ताराची (आद्या) एंट्री झाली. या एपिसोडमध्ये आद्याने थेट अमोल कोल्हेंसोबत स्क्रीन शेअर केली. आद्या 'स्वराज्यर क्षक संभाजी' मालिकेचा एक भाग झाल्यामुळे अमोल कोल्हे यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट करत आद्याचे कौतुक केले
अमोल कोल्हेंची फेसबुक पोस्ट
कालपर्यंत "दमलेल्या बाबाची कहाणी" ऐकून हळवी होणारी पोर जेव्हा बाबा का दमतो हे जाणून घेते..... एक दडपण येतं जेव्हा तुमचा सहकलाकार चोख पाठांतर, expressions, action continuity आणि sincerity मध्ये तोडीस तोड असतो आणि मुख्य म्हणजे "हे चुकलं" असं बिनधास्त सांगू शकतो....Proud of you and very much pleased to have you on board "Aadya Amol Kolhe"
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement