Republic Day 2022 : Amitabh Bachchan यांच्या प्रजासत्ताक दिनाच्या अनोख्या शुभेच्छा; दाढी रंगली तिरंग्याच्या रंगात
Republic Day 2022 : बिग बींनी प्रजासत्ताक दिनाच्या हटके शुभेच्छा चाहत्यांना दिल्या आहेत.
Republic Day 2022 : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण अमिताभ बच्चन यांनी तिरंग्यातील रंगांप्रमाणे दाढी आणि मिशी रंगवल्याचे दिसत आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांची दाढी आणि मिशी तिरंग्यातील रंगांप्रमाणे रंगवल्याचे दिसत आहे. फोटो शेअर करत त्यांनी 'प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा' असे कॅप्शन लिहिले आहे. या फोटोमुळे अभिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.
View this post on Instagram
अमिताभ बच्चन यांच्या फोटोवर विनोदवीर कपिल शर्माने देखील कमेंट केली आहे. त्याने कमेंट करत म्हटले आहे,'हाहाहाहा'. अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चन नंदानेदेखील हास्याच्या इमोजीसह प्रतिक्रिया दिली.
संबंधित बातम्या
Anushka Sharma : अनुष्काच्या प्रोडक्शन हाऊसचं Amazon, Netflix सोबत 400 कोटीचं डील; रिलीज होणार हे चित्रपट, वेब सीरिज
Republic Day 2022 : बॉलिवूडकरांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या खास शुभेच्छा; शेअर केली पोस्ट
Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिन साजरा करताय, मग संविधानाचे महत्त्व सांगणारी ही खास मालिका पाहाच
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha