(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bollywood Stars Home : ऋतिक ते बिग बी; 2021 मध्ये 'या' बॉलिवूड कलाकारांनी घेतलं कोट्यवधींचं घर
Bollywood Stars Home: 2021 मध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आलिशान घरं घेतली.
Bollywood Stars Home: कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. बॉलिवूड कलाकारांच्या लाईफस्टाईलबद्दल सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते. 2021 मध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आलिशान घरं घेतली. जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor), ऋतिक रोशन (Hrithik Roshan), अजय देवगन (Ajay Devgn), आयुष्मान खुराना आणि (Ayushmann Khurrana) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) या कलाकारांनी 2021 मध्ये घर घेतलं. जाणून घेऊयात या कालाकारांच्या घरांच्या किंमतींबाबत...
जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor): बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जाह्नवी कपूरने मुंबईमधील जुहू येथे आलिशान घर घेतलं आहे. एका रिपोर्टनुसार, जाह्नवीच्या या नव्या घराची किंमत 39 कोटी आहे.
ऋतिक रोशन (Hrithik Roshan): काही दिवसांपूर्वी अभिनेता ऋतिक रोशनने जुहू वर्सोवा लिंक रोड येथे तीन पेंट हाऊस खरेदी केले आहेत. या पेंट हाऊसची किंमत जवळपास 100 कोटी रूपये आहे.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan): 2021 मध्ये घर खरेदी करणाऱ्या कलाकारांच्या यादीत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे नाव देखील आहे. अमिताभ यांनी मुंबईमध्ये ओशिवारा येथे 31 कोटी रूपयांचे डुप्लेक्स घर खरेदी केले आहे. अमिताभ यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट लवकरच प्रेक्षरकांच्या भेटीस येणार आहे.
अजय देवगन (Ajay Devgn): अजय देवगन यांनी जुहूमध्ये घर घेतले आहे. या घराची किंमत 60 कोटी रूपये आहे.
आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana): चंडीगढमधील पंचकुला येथे आयुष्मानने एक घर खरेदी केले आहे. या घराची किंमत 9 कोटी आहे.
संबंधित बातम्या
Kiara Advani : कियारा आडवाणीची नवी लग्झरी कार; किंमत ऐकलीत तर व्हाल अवाक्
Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित