बच्चन कुटुंबातील आणखी एक नातं मोडणार? अमिताभ यांची नात नव्या नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदीच्या ब्रेकअपच्या चर्चा
Siddhant Chaturvedi And Navya Nanda Breakup: अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत.
![बच्चन कुटुंबातील आणखी एक नातं मोडणार? अमिताभ यांची नात नव्या नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदीच्या ब्रेकअपच्या चर्चा Amid Abhishek Bachchan Aishwarya Rai divorce rumours, actor's niece Navya Naveli Nanda and Siddhant Chaturvedi break up बच्चन कुटुंबातील आणखी एक नातं मोडणार? अमिताभ यांची नात नव्या नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदीच्या ब्रेकअपच्या चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/04/3bdd2c88df42c526ad197580d3c607d01722736336786720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Siddhant Chaturvedi And Navya Nanda Breakup: बॉलीवूडमध्ये सध्या एका कुटुंबाच्या वैयक्तिक आयुष्याची बरीच चर्चा सुरु आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा लेक अभिषेक बच्चन (Abhishek Bchchan) आणि ऐश्वर्या बच्चन (Aishwarya Rai) यांच्या नात्याच्या सध्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आता अमिताभ यांची नात नव्या नंदा हिच्या देखील ब्रेकअपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. नव्या नंदा (Navya Nanda) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) यांच्या ब्रेकअपच्या सध्या जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत.
मागील दोन वर्षांपासून नव्या नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदी एकमेकांना डेट करत होते. त्यातच आता त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पण अद्याप यावर कुणीही अधिकृत भाष्य केलं नाहीये. त्यामुळे आता बच्चन कुटुंबातील आणखी एक नातं मोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
नव्या नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदीचं ब्रेकअप?
सिद्धांत चतुर्वेदी गली बॉय आणि गहरियान या चित्रपटातील त्याच्या इंटिमेट सीन्समुळे चर्चेत आहे. अभिनेत्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे बोलणे आवडत नाही, म्हणून त्याने नव्यासोबतच्या नात्यावर कधीच भाष्य केलं नाही. दोघेही अनेकदा लंच डेट आणि डिनर डेटवर त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यामुळे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या.
कोण आहे नव्या नंदा?
नव्या नंदा ही अमितभा बच्चन यांची नात आणि श्वेता नंदा यांची मुलगी आहे. आईप्रमाणेच ती अभिनेत्री नसून बिझनेसवुमन आहे आणि हेल्थ प्लॅटफॉर्म चालवते. गेल्या वर्षी सिद्धांतने नव्याची आई श्वेता नंदा हिची देखील भेट घेतली असल्याचं म्हटलं जात होतं. त्याचप्रमाणे श्वेता नंदाने त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केल्याचंही म्हटलं जात होतं. पण आता त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा ऐकून त्यांच्या चाहत्यांना देखील धक्का बसला असल्याचं पाहायला मिळत आहे.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन घेणार ग्रे घटस्फोट?
काही दिवसांपूर्वी अभिषेकने सोशल मीडियावर घटस्फोटाच्या पोस्टला लाईक करून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अभिषेकने लाईक केलेली घटस्फोट पोस्ट ग्रे घटस्फोट आणि दाम्पत्याच्या आयुष्यावर त्याचा परिणाम याविषयी होती. यानंतर प्रश्न उपस्थित होऊ लागले की ऐश्वर्या आणि अभिषेकही ग्रे घटस्फोट घेणार का? 'ग्रे डिव्होर्स' हा घटस्फोट आहे जेव्हा एखादे जोडपे अनेक वर्षे एकत्र घालवल्यानंतर वेगळे होतात. जेव्हा जोडपे 50 वर्षांचे होतात तेव्हा हे घटस्फोट होतात. याव्यतिरिक्त, दीर्घकाळ एकत्र घालवल्यानंतर विभक्त झालेल्या जोडप्याला सिल्व्हर स्प्लिटर म्हणून लेबल केले जाते.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)