एक्स्प्लोर

सिंघम अगेन, भूल भुलैया 3 नाही बॉक्स ऑफिसवर डंका 'या' साऊथच्या चित्रपटाचा डंका; पहिल्याच दिवशी केली बक्कळ कमाई

अजय देवगणचा मल्टीस्टारर सिंघम अगेन आणि कार्तिक आर्यनचा भूल भुलैया 3 ला मागे टाकत, बॉक्स ऑफिसवर साऊथच्या अमारनचा डंका, पहिल्याच दिवशी केली छप्परफआड कमाई...

Amaran Box Office Collection Day 1: दिवाळीच्या (Diwali) दिवशी अजय देवगणचा (Ajay Devgan) मल्टीस्टारर सिंघम अगेन (Singham Again) आणि कार्तिक आर्यनचा भूल भुलैया 3 (Bhool Bhulaiyaa 3) एकाच दिवशी रिलीज झाले आहेत. अशातच बॉक्स ऑफिसवर या दोन चित्रपटांमध्ये टक्कर होणार आहे. मात्र, या दोन चित्रपटांच्या ब्लॉकबस्टर ओपनिंगपूर्वीच साऊथच्या (South Movie) अमारन चित्रपटानं बंपर ओपनिंग मिळवली आहे. दिवाळीच्या दिवशी म्हणजेच, 31 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या अभिनेता शिवकार्तिकेयन आणि साई पल्लवी यांच्या चित्रपटानं भारतात 20 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर जगभरात हा आकडा 30 कोटींच्या पुढे गेला आहे.

बॉक्स ऑफिस ट्रॅकर Sacknilk च्या डेटानुसार, पॉझिटिव्ह रिव्यूसह, अमारननं भारतात 21.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरातील कलेक्शन 30 कोटींच्या पुढे गेलं आहे. तर चित्रपटाचं बजेट 130 कोटी आहे. आतापर्यंतचा चित्रपटाचा डंका पाहिला तर, हा चित्रपट हॉलिडे विकेंडवर हा आकडा अगदी सहज पार करेल. 

राजकुमार पेरियासामी दिग्दर्शित अमारन हा शिवकार्तिकेयनचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरू शकतो. या चित्रपटानं पहिल्याच आठवड्यात ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 22 कोटींची कमाई केली आहे. यामुळे चित्रपटाची कमाई चांगली झाल्याचं बोललं जात आहे.

अमारन चित्रपटाबाबत सांगायचं झालं तर, भारतीय लष्कराच्या राजपूत रेजिमेंटचे एक कमिशन्ड अधिकारी मेजर मुकुंद वरदराजन यांच्या आयुष्यावर आधारित आहे, ज्यांना 44 व्या राष्ट्रीय रायफल्स बटालियनमध्ये प्रतिनियुक्तीवर असताना दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान त्यांच्या शौर्यासाठी सन्मानित करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमध्ये त्यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आले. या चित्रपटात शिवकार्तिकेयननं मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात साई पल्लवी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Filmstar Life : आई-वडिल 'सुपरस्टार', पण दोन्ही मुलं 'सुपरफ्लॉप'; एका मुलानं तर बुडवली 100 कोटींची फिल्म, ओळखलंत का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
काळमांडवी धबधब्यावर पर्यटनास गेलेले २ तरुण बुडाले; ऐन दिवाळीतच दु:खद घटना
काळमांडवी धबधब्यावर पर्यटनास गेलेले २ तरुण बुडाले; ऐन दिवाळीतच दु:खद घटना
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sattar vs Danve Special Report :सत्तारांच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवे म्हणतात, औरंगजेबानं धमकावू नयेPolitical Leaders Property Special Report :  संपत्तीवरून वाद,आरोपांची वात ; सात उमेदवार टार्गेटRashmi Shukla Special Report : शुक्लांना कधी हटवणार? पटोलेंचा सवालाचा बाॅम्बManoj Jarange Maratha Reservation :  मराठा समाजाने पाठिंबा द्यायचे उमेदवार, मतदार संघ 3 तारखेला जाहिर करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
काळमांडवी धबधब्यावर पर्यटनास गेलेले २ तरुण बुडाले; ऐन दिवाळीतच दु:खद घटना
काळमांडवी धबधब्यावर पर्यटनास गेलेले २ तरुण बुडाले; ऐन दिवाळीतच दु:खद घटना
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
Shaina NC Vs Arvind Sawant : 'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार
मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार
बीडमधील 6 मतदारसंघात लढती ठरल्या, जरांगेंची जादू चालणार; महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
बीडमधील 6 मतदारसंघात लढती ठरल्या, जरांगेंची जादू चालणार; महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Embed widget