Allu Arjun : 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनने नाकारली दारू अन् तंबाखूची जाहिरात! कोट्यवधींच्या ऑफरला दिला नकार; चाहत्यांकडून कौतुक
Allu Arjun : अल्लू अर्जुनने दारू आणि तंबाखूची जाहिरात करण्यास नकार दिला आहे. कोट्यवधी रुपयांची जाहिरात त्याने नाकारली आहे.
Allu Arjun : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) सध्या त्याच्या आगामी 'पुष्पा 2' (Pushpa 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या शूटिंगमध्ये सध्या तो व्यस्त आहे. अल्लू हा दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता असून त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनयाव्यतिरिक्त त्याने आपल्या कृत्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'पुष्पा' (Pushpa) फेम अल्लू अर्जुनने दारू आणि तंबाखूची जाहिरात करण्यास नकार दिला आहे. कोट्यवधी रुपयांची जाहिरात त्याने नाकारली आहे.
अल्लू अर्जुनने नाकारली 10 कोटी रुपयांची ऑफर
अल्लू अर्जुनला एका दारूच्या आणि तंबाखूच्या कंपनीने एका जाहिरातीसाठी विचारणा केली होती. या जाहिरातीसाठी अल्लू अर्जुनला 10 कोटी रुपये मिळणार होते. पण अल्लू अर्जुनला कोणताही वाईट संदेश द्यायचा नव्हता. त्यामुळे त्याने ही जाहिरात करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना 'पुष्पा 2'ची प्रतीक्षा
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा द राइज' (Pushpa The Rise) हा सिनेमा 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमातील अभिनयासाठी अल्लू अर्जुनला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाल. आता 'पुष्पा 2' या सिनेमात अल्लू अर्जुनचा आणखी धमाकेदार अंदाज पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी 'पुष्पा 2'मधील अल्लू अर्जुनचं पोस्टर आऊट झालं. चाहत्यांना आता रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) पोस्टरची प्रतीक्षा आहे. सिनेमागृहात धमाका केल्यानंतर हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे.
View this post on Instagram
दाक्षिणात्य अभिनेत्री सई पल्लवी 'पुष्पा 2' या सिनेमात झळकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच बॉलिवूड अभिनेताही या सिनेमात दिसून येईल. अद्याप यासंदर्भात निर्मात्यांनी काहीही घोषणा केलेली नाही. 'पुष्पा 2' हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदीसह, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 'पुष्पा 2' हा सिनेमाही ब्लॉकबस्टर होणार आहे. सुकुमार या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. 'पुष्पा' या सिनेमाने अल्लू अर्जुनला पॅन इंडिया स्टार बनवलं आहे. अल्लू अर्जुन हा व्यसनाधीन नाही.
संबंधित बातम्या