Allu Arjun : बाबो! 'पुष्पा 2'साठी अल्लू अर्जुनने दुप्पट घेतलं मानधन; आकडा वाचून व्हाल थक्क...
Pushpa 2 : अल्लू अर्जुनने (Allu Arjun) 'पुष्पा 2'साठी चांगलच मानधन घेतलं आहे.
Allu Arjun Pushpa 2 Fees : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) सध्या 'पुष्पा 2' (Pushpa 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. तसेच या सिनेमातील 'पुष्पा'चा लूकदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता टीझर रिलीज झाल्याने पुष्पाच्या पुढच्या भागाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. तसेच आता 'पुष्पा' सिनेमातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
अल्लू अर्जुनने 'पुष्पा 2'साठी घेतलेत कोट्यवधी रुपये
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार,'पुष्पा द राइज' (Pushpa: The Rise) या सिनेमासाठी अल्लू अर्जुनने 45 कोटी रुपये आकारले होते. आता या सिनेमाचा पुढचा भाग अर्थात 'पुष्पा द रुल' (Pushpa: The Rule) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमासाठी अल्लू अर्जुनने 85 कोटी मानधन घेतली आहे.
View this post on Instagram
'पुष्पा' सिनेमाप्रमाणे 'पुष्पा 2'मध्येही अल्लू अर्जुनसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika mandanna) मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तसेच मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा द रुल' या सिनेमात साई पल्लवीची (Sai Pallavi) एन्ट्री होऊ शकते असे म्हटले जात आहे.
'पुष्पा द राइज' हा सिनेमा आंध्र व तेलंगनामधील बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला होता. पण जागतिक पातळीवर हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. अल्पावधीतच या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
'पुष्पा'चा फर्स्ट लूक आऊट!
अल्लू अर्जुसह 'पुष्पा'चा दिग्दर्शक सुकुमारनेदेखील 'पुष्पा द रुल' या सिनेमासाठी मानधन वाढवलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी 'पुष्पा द रुल' या सिनेमातील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भरजरी साडी, हातात बांगड्या, बंदूक, गळ्यात लिंबाची माळ, कानात झुमके, गळ्यात हार या पुष्पाच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं असून ते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
'पुष्पा द राइज' हा सिनेमा 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातील 'ऊ अंतवा', 'श्रीवल्ली' आणि 'सामी सामी' ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता 'अब रुल पुष्पा का' असं म्हणत 'पुष्पा 2'चा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या