एक्स्प्लोर

Alia Bhatt : यशराजच्या स्पाय युनिव्हर्समध्ये आलिया भटची धमाकेदार एन्ट्री, 'या' अभिनेत्रीचीही वर्णी

Alia Bhatt Latest News : आलिया भट पहिल्यांदाच यशराजच्या स्पाय युनिव्हर्स फिल्मस सीरिजमध्ये झळकणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

Alia Bhatt :   यशराज फिल्मसकडून निर्मिती होणाऱ्या स्पाय युनिव्हर्स (YRF Spy Universe) चित्रपटांची सीरिजमध्ये आता आलिया भटचीही एन्ट्री झाली आहे. आलिया भट (Alia Bhatt) पहिल्यांदाच यशराजच्या स्पाय युनिव्हर्स फिल्मस सीरिजमध्ये झळकणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. मागील काही महिन्यांपासून आलिया भटदेखील यशराजच्या स्पाय मुव्ही सीरिजमध्ये झळकणार असल्याची चर्चा होती. आता मात्र, प्रोडक्शन हाऊसनेच या बातमीवर शिक्कामोर्तब केले आहे. 

यशराज फिल्मसचे सीईओ अक्षय विधानी यांनी फिक्की फ्रेमस दरम्यान मंगळवारी आलिया भट आणि स्पाय मुव्ही सीरिजबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, सिनेइंडस्ट्रीमधील एक गौप्यस्फोट करणार आहे. आलिया भट स्पाय युनिव्हर्सच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण याच वर्षी सुरू होणार आहे. या चित्रपटाबद्दलची माहिती येत्या काही दिवसात सगळ्यांसमोर येईल, असेही विधानी यांनी सांगितले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

या अभिनेत्रीचीही लागली वर्णी 

या अॅक्शनपटात आलिया भटसोबत शर्वरी वाघ ही अभिनेत्रीदेखील झळकणार आहे. शर्वरी वाघने 'प्यार का पंचनामा 2', 'बाजीराव मस्तानी', 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.  अॅमेझॉन प्राईमवर झळकलेल्या  द फॉरगॉटन आर्मी - आझादी के लिए या वेब सीरिजमध्ये सनी कौशलसोबत झळकली होती. त्यानंतर बंटी और बबली 2 चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

YRF च्या  स्पाय युनिव्हर्स सीरिजमधील चित्रपटांची यादी 

YRF च्या स्पाय युनिव्हर्सची  सुरुवात सलमान खानच्या 'एक था टायगर' मधून झाली. त्यानंतर 'टायगर जिंदा है' आणि हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'वॉर' हा चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या भूमिका असलेल्या 'पठाण'ची या स्पाय युनिव्हर्समध्ये एन्ट्री झाली. त्यानंतर सलमान खान आणि कतरिना कैफचा 'टायगर 3' प्रदर्शित झाला. आता या फ्रँचायझीचा पुढचा चित्रपट 'वॉर 2' आहे. अयान मुखर् याचे दिग्दर्शन करत आहे. यामध्ये हृतिक रोशन, जूनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत.  

 

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Deshpande Replace From Serial: 'इन्स्टावरचे फोलोअर्स पाहून बड्या चॅनलच्या मालिकेतून रिप्लेस केलं...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं भीषण वास्तव
'इन्स्टावरचे फोलोअर्स पाहून बड्या चॅनलच्या मालिकेतून रिप्लेस केलं...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं भीषण वास्तव
Ekta Kapoor Leases Out Juhu Property In Mumbai: एकता कपूरची स्मार्ट रिअल इस्टेट डिल, अख्खा मजला भाड्यानं दिलाय, दर महिन्याला कमावतेय लाखो रुपयांचा नफा, ऐकून तुम्हीही म्हणाल, क्या बात!
एकता कपूरची स्मार्ट रिअल इस्टेट डिल, अख्खा मजला भाड्यानं दिलाय, दर महिन्याला कमावतेय लाखो रुपयांचा नफा, ऐकून तुम्हीही म्हणाल, क्या बात!
Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Embed widget