![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Alia Bhatt : बॉलिवूडची नायिका झाली हॉलिवूडची खलनायिका; आलिया भट्टच्या 'Heart Of Stone'चा ट्रेलर रिलीज!
Heart Of Stone Trailer : आलिया भट्टच्या 'हार्ट ऑफ स्टोन' या सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
![Alia Bhatt : बॉलिवूडची नायिका झाली हॉलिवूडची खलनायिका; आलिया भट्टच्या 'Heart Of Stone'चा ट्रेलर रिलीज! Alia Bhatt Heart Of Stone hollywood movie trailer released Heart of Stone trailer Alia Bhatt debuts as sinister villain challenges Gal Gadot superspy in Netflix action thriller Alia Bhatt : बॉलिवूडची नायिका झाली हॉलिवूडची खलनायिका; आलिया भट्टच्या 'Heart Of Stone'चा ट्रेलर रिलीज!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/18/63792f1c25a140159b3b36e19dab6fd21687067567815254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Alia Bhatt Heart Of Stone Trailer Released : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) पहिला हॉलिवूड (Hollywood) सिनेमा 'हार्ट ऑफ स्टोन' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'हार्ट ऑफ स्टोन' या सिनेमाच्या माध्यमातून आलियाने हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं हे.
'हार्ट ऑफ स्टोन' या सिनेमात आलिया भट्ट खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर गैल गैडोट आणि जेनी डॉर्नन हे हॉलिवूडचे लोकप्रिय कलाकार या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात आलिया गैल गैडोटच्या गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. दिलेलं मिशन पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करताना आलिया दिसणार आहे.
आलियाने शेअर केला 'हार्ट ऑफ स्टोन'चा ट्रेलर (Alia Bhatt Shared Heart Of Stone Trailer)
'हार्ट ऑफ स्टोन' या सिनेमातील डायलॉग खूपच दमदार आहेत. आलियाने सोशल मीडियावर ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करत तिने लिहिलं आहे,"हार्ट ऑफ स्टोन...ऑगस्ट 11... नेटफ्लिक्स". 'हार्ट ऑफ स्टोन'चा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांना आता सिनेमाची प्रतीक्षा आहे. आलियाने शेअर केलेल्या ट्रेलरवर अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
View this post on Instagram
'हार्ट ऑफ स्टोन' या सिनेमाची आलियाचे चाहते गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. प्रेग्नेंसी दरम्यान ही आलियाने या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. आलियाचा हा पहिलाच हॉलिवूड (Alia Bhatt First Hollywood Movie) सिनेमा असल्याने तिच्यासाठी हा सिनेमा खूपच खास आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चसाठी आलिया ब्राझिलमध्ये गेली होती.
'हार्ट ऑफ स्टोन' नेटफ्लिक्सवर होणार रिलीज! Heart Of Stone Release On Netflix)
आलिया भट्टचा आगामी 'हार्ट ऑफ स्टोन' हा हॉलिवूड सिनेमा नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची घुरा टॉम हार्परने सांभाळली आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान आलियाला अनेक गोष्टी शिकता आल्या आहेत, असं ती एका मुलाखतीत म्हणाली होती.
संबंधित बातम्या
Alia Bhatt Hollywood Movie : आलिया भट्टची गगनभरारी! नेटफ्लिक्सच्या 'Heart Of Stone' सीरिजमधून हॉलिवूडमध्ये पदार्पण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)