Alia Bhatt Hollywood Movie : आलिया भट्टची गगनभरारी! नेटफ्लिक्सच्या 'Heart Of Stone' सीरिजमधून हॉलिवूडमध्ये पदार्पण
Alia Bhatt Hollywood Movie : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आता हॉलिवूडमध्ये झळकणार आहे. नेटफ्लिक्सच्या हार्ट ऑफ स्टोन या वेबसीरिजमधून आलिया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Alia Bhatt Hollywood Movie : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंच आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेला चित्रपट ब्रम्हास्त्रने (Brahmastra) देखील बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. पण, आता आलियाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बॉलिवूड सिनेसृष्टीवर आपलं स्थान निर्माण केल्यानंतर आता आलिया हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. नेटफ्लिक्सच्या हार्ट ऑफ स्टोन (Heart Of Stone) या वेबसीरिजच्या माध्यमातून आलिया हॉलिवूडमध्ये दिसणार आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला आहे.
आलिया भट्टने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरून साीरिजचा ट्रेलर शेअर केला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हार्ट ऑफ स्टोन या ट्रेलरमधून आलियाची पहिली झलक समोर आली आहे. यामध्ये आलिया जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. या सीरिजमध्ये आलिया भट्टच्या पात्राचं नाव किया (Keya) आहे.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
Netflix ने रिलीज केलेल्या 'हार्ट ऑफ स्टोन' सीरिजचा ट्रेलर तर दमदार आहे. यामध्ये अनेक महिला व्यक्तिरेखा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यामध्ये आलिया भट्ट व्यतिरिक्त वंडर वुमन म्हणजेच गॅल गॅडोट, सोफी ओकेनाडो आणि पॉल रेडी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हार्ट ऑफ स्टोन नोव्हेंबर 2023 मध्ये Netflix वर प्रदर्शित होईल. मात्र, ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
आलियाच्या या पोस्टवर सोशल मिडीयावर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तसेच चाहत्यांनी आलियावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
या अभिनेत्रींनी हॉलिवूडसृष्टी गाजवली
अभिनेत्री आलिया भट्टच्या आधीही अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी हॉलिवूड सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. यामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan), प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra), दीपिका पदुकोण (Deepika Padukone), तब्बू (Tabu) या अभिनेत्रींचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या :