Alia Bhatt Breastfeeding : आलियाचा ब्रेस्टफिडींग करतानाचा फोटो व्हायरल, फोटो मागचं सत्य काय?
Alia Bhatt Breastfeeding Photo : अभिनेत्री आलिया भटचा स्तनपान करतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
![Alia Bhatt Breastfeeding : आलियाचा ब्रेस्टफिडींग करतानाचा फोटो व्हायरल, फोटो मागचं सत्य काय? alia bhatt breast feeding photo of baby viral on social media after Ranbir kapoor daughter raha alia bhatt delivery Alia Bhatt Breastfeeding : आलियाचा ब्रेस्टफिडींग करतानाचा फोटो व्हायरल, फोटो मागचं सत्य काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/17/1eec74b4a5fb618daabebf1572ce14951671257374983322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Alia Bhatt Breastfeeding Photo Factcheck : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt ) नुकतीच आई झाली आहे. आलियाने गोंडस मुलीला जन्म दिला. आलिया तिची चिमुकली राहासोबत वेळ घालवत आई होण्याचा आनंद लुटत आहे. आलियाने सोशल मीडियावर तिच्या मदरहुडचे फोटो शेअर करत चाहत्यांना वेळोवेळी अपडेट दिली आहे. आलिया आणि रणबीर कपूरने अद्याप मुलगी 'राहा'चा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. दरम्यान, सध्या आलिया भटचा ब्रेस्टफिडींग करताना फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये आलिया भट बाळाला स्तनपान करताना दिसत आहे.
लग्नाच्या दोन महिन्यानंतरच दिली गोड बातमी
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट याच वर्षी 14 एप्रिल 2022 रोजी लग्नाच्या बेडीत अडकले. यानंतर, लग्नाच्या दोन महिन्यांनंतरच 27 जून 2022 रोजी या जोडप्याने त्यांच्या गुड न्यूज दिली. रणबीर-आलिया आई-बाबा होणार असल्याची घोषणेने सर्वजण चकित झाल्याच पाहायला मिळालं. आलियाने सोनोग्राफीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. यानंतर आलियाच्या बेबी शॉवरचा सोहळाही थाटामाटात पार पडला. याचे अनेक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले होते. आलिया आणि रणवीरच्या लाडक्या लेकीचं नाव 'राहा' आहे.
आलियाचा ब्रेस्टफिडींगचा फोटो व्हायरल (Alia Bhatt Breastfeeding Photo)
आता आलियाच्या एका फोटोने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या फोटोमध्ये आलिया भट्ट बाळाला ब्रेस्ट फीडिंग करताना दिसत आहे. लाल साडीतील आलिया भट्टचा हा फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये आलियाच्या मांडीवर एक बाळ दिसत आहे. फोटो पाहून असे दिसते की आलिया तिची मुलगी राहासोबत आहे, पण या फोटोमागचं सत्य काही वेगळंच आहे.
काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य? (Alia Bhatt Breastfeeding Viral Photo Factcheck)
आलियाच्या नावाने व्हायरल होणारा हा फोटो खूपच क्यूट आहे पण हा फोटा आलियाचा नसून तो फेक आहे. आलिया भट्ट सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि आलियाने सोशल मीडियावर ब्रेस्टफिडींग करतानाचा कोणताही फोटो पोस्ट केलेला नाही. गुगल लेन्स या फोटोमागचा खरा व्हायरल फोटो शोधला आहे. हा मूळ फोटो सापडला असून तो दुसऱ्या महिलेचा आहे. गुगल इमेज सर्चद्वारे, हा मूळ फोटो babycentre.in या वेबसाईटवर सापडला आहे. ज्यामुळे आलियाच्या नावाने व्हायरल झालेला फोटो बनावट असल्याचं स्पष्ट होतं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)